शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाची कार्यवाही थंडबस्त्यात

By admin | Updated: December 15, 2014 22:52 IST

शासनाने भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करून २०१३ ला नवीन भूसंपादन कायदा अस्तित्वात आणला. अधिनियमाचे नियम २७ आॅगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. या कायद्यानुसार भूसंपादन करण्याचे

प्रकल्प रखडले : शेतकऱ्यांच्या आशा निसर्गावर
चंद्रपूर : शासनाने भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करून २०१३ ला नवीन भूसंपादन कायदा अस्तित्वात आणला. अधिनियमाचे नियम २७ आॅगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. या कायद्यानुसार भूसंपादन करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात या कायद्यानुसार भूसंपादनाची एकही कार्यवाही न झाल्याने अनेक प्रकल्पाच्या जमीनीचा प्रश्न रेंगाळला आहे.
चिमूर, गोंडपिंपरी व मूल या तीन उपविभागात भूसंपादनाचे १४५ प्रकरण प्रलंबीत आहेत. नव्या कायद्यातील किचकट अटी व अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे भूसंपादनाची कार्यवाही थंडबस्त्यात असल्याने सिंचन प्रकल्पाच्या किमंती वाढणार असल्याचे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने म्हटले आहे.
शासनाने नव्या कायद्यानुसार भूसंपादन करण्याचे निर्देश दिले आहे. याबाबत सर्व सूचना व नियमावली ठरवून देण्यात आली. भूसंपादनाची कार्यवाही करण्याचे अधिकार संबधीत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. महसूल खात्याकडून कार्यवाही होण्यासाठी भूसंपादन कायदा १ जानेवारी २०१४ पासून लागू केला. परंतु, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून नव्या कायद्यानुसार कार्यवाही होत नसल्याने विविध प्रकल्पाना जमीनी मिळण्यात अडचणी येत आहेत.
भूसंपादनाच्या अडचणींमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बेंडारा मध्यम प्रकल्प, पळसगाव आमडी टोमटा उपसा सिंचन योजना, लाल नाला प्रकल्प व उपसा सिंचन योजना आदी सिंचन प्रकल्पाची कामे रखडली आहेत. तर अनेक सिंचन प्रकल्प वनकायद्याच्या जाचक धोरणांमुळे अडकले आहेत. जिल्ह्याच्या एकुण ११.४२ लक्ष हेक्टर भौगोलीक क्षेत्रापैकी केवळ ४६.६७ टक्के हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य आहे. भूसंपादनाची कार्यवाही व वनकायद्याची अडचण दूर झाल्यास ८ हजार ४१४ हेक्टर क्षेत्राला सिंचन व्यवस्था होणार आहे. मात्र, शासन व प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने आजही अनेक शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)