शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
3
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
4
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
5
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मधूनही दीपिका पादुकोण बाहेर? मेकर्सने केलं स्पष्ट
6
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
7
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
8
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
9
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
10
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
11
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
12
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
13
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
14
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
15
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
16
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
17
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
18
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
19
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
20
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी केवळ तीन हजार कुटुंब पात्र

By admin | Updated: December 15, 2014 22:53 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून इंदिरा आवास योजना राबवली जाते. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला हक्काचा निवारा दिला जातो. मात्र या योजनेत २०१४-१५ या वर्षात अनुसूचित जमाती,

अनेकश्वर मेश्राम - बल्लारपूरजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून इंदिरा आवास योजना राबवली जाते. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला हक्काचा निवारा दिला जातो. मात्र या योजनेत २०१४-१५ या वर्षात अनुसूचित जमाती, अपंग व अल्पसंख्याकांना अनुशेष नसल्याच्या कारणावरुन वगळण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. या वर्षात केवळ तीन हजार २७० कुटुंबाला घरकुलासाठी पात्र ठरविण्यात आले. इंदिरा आवास योजनेसाठी ग्रामपंचायत पातळीवर २००२-०७ या वर्षातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला कच्च्या घराच्या यादीत समावेश करण्यात आला होता. त्यानुसार योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलासठी अनुदान दिले जाते. आजघडीला ग्रामीण भागात अनुसूचित जमाती, अपंग व अल्पसंख्याची कित्येकांकडे स्वत:चा निवारा नाही. कित्येक कुटुंबाचे दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नाही. परिणामी हजारोंवर कुटुंब इंदिरा आवास योजनेच्या घरकुलापासून वंचित असल्याचे चित्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे.घरकुलासाठी २०१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हाभरातील ८४७ ग्रामपंचायतीपैकी केवळ १११ ग्रामपंचायतींच्या समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील दोन हजार ३९३ व इतर मागास प्रवर्गातील ८७७ एकूण तीन २७० घरकुल लाभार्थ्यांना सन १९९७-९८ व २००२-०७ च्या दारिद्रय रेषेखालील सर्वेक्षणानुसार पात्र ठरविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याला प्रतीक्षा यादीचा आधार घेतला जात आहे.घरकूल बांधकामासाठी लाभार्थ्यांकडे २६९ चौरस फुट जागा असणे आवश्यक असून ग्रामपंचायतीचा नमूना आठ आवश्यक आहे. आजघडीला घरकूल लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप पंचायत समिती स्तरावर संवर्ग विकास अधिकारी यांच्या मार्फत दिले जाते. या योजनेत लाभार्थ्यांने घरकूल बांधकामासोबत शौचालयाचे बांधकाम करण्याची अट घातली आहे. यासाठी शासनाकडून एक लाख रुपयांचा निधी दिला जाते. तीन टप्प्यात लाभार्थ्यांला निधीचे वाटप करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. यावर्षी इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांत बल्लारपूर तालुक्यातील केवळ कळमना व कोठारी या दोन ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जातीचे ४९ व इतर मागास प्रवर्ग वर्गातील २३ असे एकूण ७२ घरकूल धारकांना लाभ देण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये अनुसूचित जमाती, अपंग व अल्पसंख्याक लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे.