शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या आराखड्यात फक्त सावर्जनिक कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी विकास निधी मिळतो. याशिवाय जिल्हा परिषदेकडूनही बऱ्याच योजनांकरिता आर्थिक मदत मिळत असल्याने ग्रामपंचायतींना विविध योजना राबविणे शक्य होते. मात्र, काही ग्रामपंचायतींनी उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण करून गावातील पायाभूत विकासकामांसोबतच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या कमकुवत उपेक्षित घटकांसाठी वैयक्तिक स्वरूपाच्या योजना राबवितात.

ठळक मुद्दे१५ वा वित्त आयोगातील जाचक अट : दुर्बल घटकांच्या योजनांना कात्री

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींचा विकास आराखडा तयार करताना सार्वजनिक योजनांसोबत वैयक्तिक योजनांचाही समावेश होता. त्यामुळे गावातील दुर्बल, वंचित समाज घटकांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेणे शक्य झाले होते. मात्र, १५ व्या वित्त आयोग अंतर्गत २०२०-२१ वर्षांचा सुधारीत आराखडा तयार करताना वैयक्तिक योजनांना टाळून केवळ सार्वजनिक योजनांनाच प्राधान्य देण्याच्या सूचना ग्राम विकास विभागाने जारी केल्याने या वंचितांची विकासाच्या दृष्टीने मोठी उपेक्षा होणार आहे.ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी विकास निधी मिळतो. याशिवाय जिल्हा परिषदेकडूनही बऱ्याच योजनांकरिता आर्थिक मदत मिळत असल्याने ग्रामपंचायतींना विविध योजना राबविणे शक्य होते. मात्र, काही ग्रामपंचायतींनी उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण करून गावातील पायाभूत विकासकामांसोबतच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या कमकुवत उपेक्षित घटकांसाठी वैयक्तिक स्वरूपाच्या योजना राबवितात. चंद्रपूर जिल्ह्यात अशा ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीने तर ग्रामपंचायतींला मोठे आर्थिक पाठबळ मिळाले. त्यामुळे विकास आराखडा तयार करताना वैयक्तिक योजनांचा समावेश करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामसभा महत्त्वाची भूमिका बजावत आल्या आहेत. सध्या १५ व्या वित्त आयोगअंतर्गत २०२०-२१ वर्षाचा सुधारित आराखडा तयार करण्याचे काम राज्यातील ग्रामपंचायती करीत आहेत. या आयोगातील ५० टक्के निधी बंधित स्वरूपाचा ठेवण्याचा आदेश पंचायत विभागाने जारी केला. त्यानुसार या निधीतून शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, इमारत, पाणी पुरवठा योजना, घनकचरा, जुनी विहिर दुरूस्ती, फॉगिंग मशिन खरेदी, सौर ऊर्जा, विद्युतपंप, जलशुद्धीकरण यासारखी विविध सार्वजनिक कामांनाच सुधारीत आराखड्यात सामावून घेण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. परिणामी, सार्वजिक कामे करतानाच दुर्बल घटकांसाठी योजना राबविणाºया ग्रामपंचायतींसमोर अडचण निर्माण होऊ शकते.अखर्चित निधी परत मागितल्याने कोंडीआर्थिक वित्तीय तुट भरून काढण्यासाठी १४ व्या आयोग अंतर्गत दिलेला अखर्चित निधी परत करण्याचे राज्य शासनाने निर्देश दिले. कोरोना आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्याने अनेक ग्रामपंचायतींनी आपल्या पातळीवर याचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. त्यासाठी साहित्य खरेदी केली. पण त्याची देयके प्रलंबित आहेत. कोरोनामुळे या वर्षीच्या कर वसुलीलाही मोठा फटका बसला. अशी चिंताजनक परिस्थिती असताना शासनाने अखर्चित निधी परत मागितल्याने ग्रामपंचायतींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.१५ व्या वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायतींचा सुधारीत आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. विकासकामे समाविष्ट करण्याबाबत सद्यस्थितीत थोडा बदल करण्यात आला आहे. मात्र, ग्रामपंचायतींना १० टक्के वैयक्तिक स्वरूपाच्या योजना राबविण्याची मूभा आहे.-निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प. चंद्रपूर

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत