जिल्ह्यात नवीन केवळ चार रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST2021-07-05T04:18:18+5:302021-07-05T04:18:18+5:30

चंद्रपूर : मागील २४ तासांत जिल्ह्यात २१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तसेच कोरोनाबाधित चारजणांची ...

Only four new patients added to the district | जिल्ह्यात नवीन केवळ चार रुग्णांची भर

जिल्ह्यात नवीन केवळ चार रुग्णांची भर

चंद्रपूर : मागील २४ तासांत जिल्ह्यात २१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तसेच कोरोनाबाधित चारजणांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या चार रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील एक, भद्रावती एक, पोंभूर्णा येथील एका रुग्णाचा समावेश आहे, तर चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती या तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नसून, काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ७३४ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार २३ झाली आहे. सध्या १७९ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत ५ लाख ६७ हजार ७५१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४ लाख ८० हजार ४६८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५३२ बाधितांचे मृत्यू झाले आहेत.

Web Title: Only four new patients added to the district