शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३३२ गावांत मॅजिक बसचे ऑनलाईन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST

राजू गेडाम मूल : कोरोनाचा गेल्या दोन वर्षांपासून प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना शिक्षणात अखंडतेचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन ...

राजू गेडाम

मूल : कोरोनाचा गेल्या दोन वर्षांपासून प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना शिक्षणात अखंडतेचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षण असले, तरी अभ्यासाव्यतिरिक्त शिक्षणाने मौलिक विचार करायला भाग पाडले जाते. हेच हेरून मॅजिक बस या संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील विविध सामाजिक, बौध्दिक विषयांवर विविध उपक्रमांतून शिक्षण दिले जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थीवर्गात उत्साह दिसून येत आहे. ३३२ गावांत विद्यार्थ्याच्या बौद्धिकतेला चालना देण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने कोरोना काळात पालकवर्गानी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी आदी तालुक्यांतील शाळांमध्ये स्केल कार्यक्रमाअंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ३८,००० विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाद्वारे ‘शिक्षण व जीवन कौशल्य विकास’ हा कार्यक्रम मागील दोन वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. तेव्हापासून मॅजिक बस संस्थेच्यावतीने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने जीवन कौशल्य शिकविण्याचे कार्य मात्र सातत्याने सुरू आहे. त्यामागील मुख्य हेतू असा की, विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजावित व शाळेतील मुख्य विषयांमध्ये मुख्यतः भाषा, गणित, विज्ञान आदी विषयांच्या अध्ययनात खंड पडू नये, या हेतूने मॅजिक बस संस्थेचे कर्मचारी व गावातील समुदाय समन्वयक सतत्याने प्रयत्नशील आहेत.

हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेतील संपूर्ण तालुक्याचे तालुका समन्वयक निकिता ठेंगणे, योगेश मोरे, सुपडा वानखेडे, नीतेश मालेकर, हिराचंद रोहनकर, तसेच संपूर्ण ०९ तालुक्यांतील ३० शाळा सहायक अधिकारी व गावातील ३३२ समुदाय समन्वयक हे परिश्रम घेत असल्याचे दिसून येते.

बॉक्स

या बाबी शिकविल्या जातात

विद्यार्थ्यांना अभ्यास कोपरा तयार करायला सांगणे, प्रत्येक सत्रानंतर गृहपाठ देणे, पाढे पाठांतर करायला सांगणे, गणितीय क्रिया सोडवणे, सूत्र पाठांतर करून घेणे आणि विद्यार्थी या सगळ्या गोष्टी करत आहेत की नाही, याचा फोनद्वारे पाठपुरावा घेणे, पालकांशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत चर्चा करणे आदी या अभिनव उपक्रमाचे महत्त्वपूर्ण घटक आहे. या सगळ्या बाबींना विद्यार्थी व पालक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. वरील कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील ०९ तालुक्यांतील ३३२ गावांमध्ये ३८,००० विद्यार्थ्यांसोबत राबविण्यात येत आहे.