शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

एक लाख नऊ हजार ज्येष्ठांची दुसऱ्या डोससाठी ताटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 5:00 AM

जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर ४०० ते ५०० लसी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. दरम्यान, कोरोना संसर्ग वाढल्याने नागरिक जागृत झाले.  आरोग्य विभागानेही लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी यंत्रणा कामी लावली. याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या मानसिकेतत दिसून आला. 

ठळक मुद्देचिंता वाढली : ३९ हजार ३२३ सहव्याधी नागरिकही हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा व चंद्रपूर मनपा आरोग्य विभागाने केंद्रांची संख्या वाढविली. नियोजनाच्या प्रत्येकच टप्प्यावर यंत्रणा सज्ज आहे. मात्र, केंद्र व राज्य पातळीवरील लस पुरवठ्याच्या अडचणी सुटल्या नाहीत. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्या जिल्ह्यातील एक लाख नऊ हजार १०३ ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या डोससाठी ताटकळत राहावे लागत आहे. शिवाय, पहिल्या डोसचा कालावधी पूर्ण झाल्याने ३९ हजार ३२३ सहव्याधी नागरिकांचीही चिंता वाढली आहे.जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर ४०० ते ५०० लसी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. दरम्यान, कोरोना संसर्ग वाढल्याने नागरिक जागृत झाले.  आरोग्य विभागानेही लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी यंत्रणा कामी लावली. याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या मानसिकेतत दिसून आला. आता शेकडो नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करीत आहेत. लस घेण्यास वाटेल ते दिव्य सहन करताना दिसतात. गुरुवारी जिल्ह्यात १०४ केंद्रावर लसीकरण होणार आहे. त्यासाठी आरोग्य पथक तयार करण्यात आले. नागरिक लस घेण्यासाठी केंद्रात गर्दी करू शकतात.

हेल्थ केअर,  फंटलाइन वर्करची उद्दिष्टपूर्ती  जिल्ह्यात १९ हजार ८१४ हेल्थ केअर कर्मचाऱ्यांनी पहिला डोस तर १२ हजार ६६४ जणांनी दुसरा डोस घेतला. आता दुसरा डोस घेणारे सात हजार १५० शिल्लक आहेत. २२ हजार ३१७ फंटलाइन वर्कर पहिला व नऊ हजार १२५ जणांनी दुसरा डोस घेतला. १३ हजार १९२ फंटलाइन वर्कर डोस घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. डोस उपलब्ध झाल्यास दोन्ही प्राधान्य गटाची लवकरच उद्दिष्टपूर्ती होऊ शकते. मात्र, सामान्य नागरिकांना ताटकळत राहावे लागणार आहे.

आरोग्य यंत्रणा सज्ज; आज लसीकरणासाठी गर्दी उसळणारलसीकरणासाठी प्राधान्य गटानुसार आरोग्य विभागाने तयारी करून ठेवली. परंतु, शासनाकडून जिल्ह्याला लस किती उपलब्ध होतात, यावरच सर्व काही अवलंबून आहे. पुरेशा लसीच मिळत नसल्याने आरोग्य विभागाच्या वाढीव केंद्रांना सध्या तरी अर्थच उरला नाही. या लस तुटवड्यात पहिला डोस घेऊन कालावधी पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची मात्र ताटकळ सुरू आहे. गुरुवारी जिल्ह्यात लसीकरण होणार असल्याने पात्र नागरिकांची प्रचंड गर्दी होणार आहे. चंद्रपूर मनपा प्रशासनाने शहरात १६ केंद्र लसीकरणासाठी सज्ज ठेवले.

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटात १७ हजार ९०४ जणांचे लसीकरण जिल्ह्यात मंगळवारपर्यंत दोन लाख ७४ हजार ९९७ जणांनी लस घेतली. त्यामध्ये १९ ते ४४ वयोगटातील १७ हजार ९०४ जणांचा समावेश आहे. यातही  दहा हजार ८७ कोविशिल्ड, तर सात हजार ८१७ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली. लस उपलब्ध झाल्यास संख्या पुन्हा वाढणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस