देशी व विदेशी दारूसाठ्यासह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:55 IST2020-12-04T04:55:05+5:302020-12-04T04:55:05+5:30

भद्रावती : नागपूरवरून चंद्रपूरमार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असताना नाका-बंदी दरम्यान पोलिसांनी वाहनासह तीन लाख ९० हजार ...

One arrested with domestic and foreign liquor | देशी व विदेशी दारूसाठ्यासह एकाला अटक

देशी व विदेशी दारूसाठ्यासह एकाला अटक

भद्रावती : नागपूरवरून चंद्रपूरमार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असताना नाका-बंदी दरम्यान पोलिसांनी वाहनासह तीन लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. आकाश महादेव खंडाळकर (२७) रा. भद्रनाग वाॅर्ड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

नागपूरवरुन चंद्रपूरमार्गे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती भद्रावत पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सुमठाणा परिसरात नाकाबंदी करुन एमएच १४ डीटी ५४५३ या वाहनाला थांबवून तपासणी केली. यावेळी वाहना ९० हजार रुपये किंमतीची दारु आढळून आली. पोलिसांनी सर्व दारु व वाहन असा तीन लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात केशव चिटगिरे, शशांक बदामवार, निकेश ढेंगे, रोहित चिटगिरे, दिलीप लभाणे यांनी केली.

Web Title: One arrested with domestic and foreign liquor