शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊनमुळे आॅनलाईन नामांकन झाले आॅफलाईन

By admin | Updated: October 8, 2015 00:39 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मागील ग्रामपंचायतपासून निवडणूक उमेदवाराचे नामांकन भरण्याची प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे.

उमेदवारांमध्ये तारांबळ : उरला केवळ एक दिवस खडसंगी : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मागील ग्रामपंचायतपासून निवडणूक उमेदवाराचे नामांकन भरण्याची प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे. त्यानंतर आता नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकीचे नामांकन भरण्याची प्रक्रिया १ आॅक्टोबर पासून सुरू झाली आहे. मात्र मागील चार-पाच दिवसांपासून सर्व्हर डाऊनच्या समस्येने नामांकन अर्ज भरताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे चिमूर नगरपरिषदेमधील उमेदवार त्रस्त झाले असून शेवटी चिमूर नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आॅफलाईन अर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात १ नोव्हेंबरला नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगर परिषद निवडणुकीत उमेदवारांचे नामांकन आॅनलाईन प्रणालीने भरण्याचा निर्णय घेतला. १ आॅक्टोबरपासून नामांकन भरणे सुरू झाले. भाजप, काँग्रेस, शिवसेना, बसपा, रिपाइंसह अपक्ष उमेदवारानी सर्व कागदपत्र जमा करुन पुढाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर उमेदवारांचे नामांक भरण्याची प्रक्रिया मागील पाच दिवसांपासून आरंभ केली. मात्र राज्य निवडणूक आयोगाचे संकेत स्थळ सुरु करताना सर्व्हर डाऊनची समस्या संभावित इच्छुक उमेदवारांना सतावत आहे. संकेत स्थळ उघडण्यासाठी एक दीड तास लागत आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांना पाच- पाच तास बसूनही नामांकन दाखल करण्यास अनेक अडचणी असल्याने १ ते ६ आॅक्टोबरपर्यंत फक्त एक ते दोनच अर्ज दाखल होवू शकले आहेत. नामांकन पत्र दाखल करण्यासाठी ८ तारीख शेवटची तारीख असल्याने शेवटचा एकच दिवस उरला आहे. आॅनलाईन प्रक्रियेचा घोळ पाहता चिमूर नगर परिषद निवडणूक अधिकारी संगीता राठोड यांनी सात आॅक्टोबरपासून आॅफलाईन अर्ज प्रक्रिया प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी तब्बल ३७ उमेदवारांचे अर्ज आॅफलाईन स्वीकारण्यात आले. आतापर्यंत ३८ नामांकण दाखल झाले असून यात २६ महिला व ३८ पुरूषांचा समावेश आहे. आॅनलाईन प्रणालीत ज्या उमेदवारांनी अर्ज केले असतील त्यासह आॅफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तहसील कार्यालयात उमेदवाराच्या सोईसाठी मदतकेंद्र तयार करण्यात आले असून हे केंद्र व महाआॅनलाईन सेंटर उमेदवाराच्या मदतीसाठी तयार ठेवण्यात आले आहेत. परंतु अधिकृत संकेतस्थळ योग्य प्रकारे कार्यरत नसल्याने उमेदवार व तालुका प्रशासनाची तयारी व्यर्थ जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)