शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरुग्ण शोध मोहिमेत अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील निवडलेल्या तालुक्यांमध्ये क्षयरुग्ण शोध मोहीम १६ ते २३ मार्च २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत संबंधित अधिकारी व गैरसरकारी संस्थांनी विशेष लक्ष द्यावे व मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. शोध मोहिमेमध्ये घेण्यात आलेली लोकसंख्या व घरे यांच्यापर्यंत मोहिमेचे टीम सदस्य पोहोचणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराहुल कर्डिले : जिल्हा समन्वय समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील सर्व जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील निवडलेल्या तालुक्यांमध्ये क्षयरुग्ण शोध मोहीम १६ ते २३ मार्च २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत संबंधित अधिकारी व गैरसरकारी संस्थांनी विशेष लक्ष द्यावे व मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. शोध मोहिमेमध्ये घेण्यात आलेली लोकसंख्या व घरे यांच्यापर्यंत मोहिमेचे टीम सदस्य पोहोचणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम २०२० करिता जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. पी गहलोत, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. गेडाम, आयएमएचे अध्यक्ष डॉ. किरण देशपांडे, वैद्यकीय अधिकारी तथा आरएमओ चंद्रपूरचे डॉ. हेमचंद कन्नाके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सौरभ राजूरकर, डॉ. एन. एन. जीवने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीनिवास मुक्कावार, राजेश पालीवाल, सतीश गोस्वामी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांनी सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीमेविषयी माहिती दिली. या मोहीमेत आशांचा सहभाग महत्त्वपूर्ण असणार आहे. या संदर्भात डॉ.आर.पी गहलोत यांनी माहिती दिली.सात तालुक्यांचा समावेशचंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, जिवती, कोरपणा, मूल,पोंभूर्णा, सिंदेवाही या सात तालुक्यांमध्ये सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम १६ ते २३ मार्च या कालावधीत राबविण्यात येत असून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेत ५ टक्के नमुने दूषित आढळणे अपेक्षित आहे, असे यावेळी सांगण्यात आले. यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक