शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी अभ्यास करूनच आमसभेला उपस्थित यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

शासनाकडून योजनांसाठी निधी किती प्राप्त झाला. त्यातला खर्च किती झाला, शिल्लक कामे किती याची संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असली पाहिजे. बैठकीत सदर माहिती सोबतच घेऊनच उपस्थित राहावे, अशा सूचना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत दिल्या.

ठळक मुद्देप्रतिभा धानोरकर : पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शासनाकडून योजनांसाठी निधी किती प्राप्त झाला. त्यातला खर्च किती झाला, शिल्लक कामे किती याची संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असली पाहिजे. बैठकीत सदर माहिती सोबतच घेऊनच उपस्थित राहावे, अशा सूचना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत दिल्या.यावेळी पं. स. उपसभापती प्रविण ठेंगणे, तहसीलदार महेश शितोळे, जि. प. सदस्य यशवंत वाघ, बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे, पं. स. माजी सभापती विद्या कांबळे, माजी उपसभापती नागोबा बहादे, सदस्य चिंतामन आत्राम, संवर्ग विकास अधिकारी श्रीकांत बोबडे, गटशिक्षणाधिकारी मंगेश आरेवार, महेश टोंगे उपस्थित होते. पांदण रस्ते घरकूल, अंगणवाडी, पाणीपुरवठा योजना व बांधकाम विभागाची प्रलंबित कामे सोडविण्याच्या सूचना आमदार धानोरकर यांनी दिल्या. कुचनाच्या सरपंच वर्षा ठाकरे, मांगलीचे काळे, उपसरपंच तेलंग, भराळीचे उपसरपंच रोहणकर, चालबर्डीचे सरपंच मडावी, भास्कर ताजणे यांनी समस्या मांडल्या. संचालन कराडे यांनी केले. आभार धनपाल फटिंग यांनी मानले.अंगवाडीसेविकांची पदे रिक्ततालुक्यातील अनेक अंगणवाडी केंद्रात सेविका व मदतनिसांच्या जागा रिक्त आहेत. चालबर्डी (कोंढा) येथे अंगणवाडीसेविका नसल्याने काही पोषण आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. माजरी येथील जि. प. शाळेला इमारत नाही. पिरली, फराळा येथे मदतनिस शिकवित असल्याच्या तक्रारी आमसभेत पुढे आहे.पाच गावे घरकूल योजनेपासून वंचिततालुक्यातील ढोरवासा मांगली रै कुनाडा, चिरादेवी, टाकळी या ग्रामपंचायतींच्या घरकूल याद्या गेल्या पाच वर्षांपासून आॅनलाईन झाल्या नाही. त्यामुळे या गावांना प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकूल व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही.पांदण रस्त्यांचा अभावशिवरस्त्यासाठी सुमारे ३०० तक्रारी आल्या. त्यामुळे येत्या ४ ते ५ वर्षांत पांदण रस्त्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही आमदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Socialसामाजिक