शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी अस्मिता रॅलीने ब्रह्मपुरी शहर दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:01 IST

याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी संघटनेचे राजाध्यक्ष श्याम लेडे, ज्येष्ठ सल्लागार रामराव हरड, तालुक्यातील ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ शाखा ब्रम्हपुरीचे पदाधिकारी, ओबीसी समाजतील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

ठळक मुद्देनागरिकांचा प्रतिसाद : विविध गावांत रॅलीचे स्वागत, ओबीसी जनगणना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे आयोजित अस्मिता रथयात्रेचे ब्रह्मपुरी तालुक्यात स्वागत करण्यात आले. दरम्यान ब्रह्मपुरी येथील जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर गंगाबाई तलमले महाविद्यालयाच्या प्रांगणात समारोप करण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी संघटनेचे राजाध्यक्ष श्याम लेडे, ज्येष्ठ सल्लागार रामराव हरड, तालुक्यातील ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ शाखा ब्रम्हपुरीचे पदाधिकारी, ओबीसी समाजतील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.तालुक्यात या रॅलीचा अड्याळ टेकडी येथून प्रारंभ झाला. वायगाव, चोरटी, भगवानपूर, तुलानमाल मार्गे गांगलवाडी, रुई, निलज, पाचगाव किन्ही, बेटाळा, सोनेगाव, सावलगाव, चिंचोली, सुरबोडी येथून ब्रम्हपुरी येथे हुतात्मा स्मारक याठिकाणी पोहचली. त्यानंतर मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत गंगाबाई तलमले महाविद्यालयात रॅलीचे सभेत रूपांतर झाले.याप्रसंगी शाम लेंडे, प्रा. प्रकाश बगमारे, भाऊराव राऊत, प्रा. डॉ. हितेंद्र धोटे, मोंटू पिलारे, प्रा. डॉ. राकेश तलमले, सभापती रामलाल दोनाडकर, सरपंच ज्ञानेश्वर भोयर आदींची उपस्थिती होती. राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अन्यथा बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रास्ताविक बुराडे, संचालन चौधरी, आभार पितेश्वर शिवणकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.‘अस्मिता’ रथाचे वरोऱ्यात स्वागतवरोरा : ओबीसी जनगणना अस्मिता रथ यात्रा २ मार्च २०२० पासून संपूर्ण जिल्हाभर जनजागृती करण्याकरिता निघाली आहे. सदर यात्रेचे वरोरा तालुक्यात स्वागत करण्यात आले. तालुक्यातील वनोजा, पांझुर्णी, वंधली, माढेळी, येवती, वाघनख, चिकणी, डोंगरगाव, टेमुर्डा या गावांना भेटी देवून पत्रके वाटण्यात आले. त्यानंतर वरोरा येथे सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी अ‍ॅड. जयंत ठाकरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघांचे सचिन राजूरकर, मदनराव ठेंगणे, अनिल झोटिंग, लक्ष्मण गमे, अ‍ॅड. प्रदीप बुरान, दत्ता बोरेकर, प्रा. रूपालाल कावळे, जावेद पाशा, छोटूभाई शेख, किशोर डोमकावळे, लता हिवरकार, आशिष घुमे, वसंत राखुंडे, श्याम लेडे, डॉ. नगराळे, पुंडलिक कौरासे, केवलराम निखाडे, अशोक टिपले, आदींची उपस्थिती होती.