शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

नऊ गावांत कोरोना रुग्णांची संख्या शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

सर्व गावात लसीकरण मोहीम जोरात सुरू असून, तहसीलदार संजय राईंचवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, तालुक्याचे संवर्ग विकास अधिकारी किरणकुमार धनवडे यांच्यासह गावपातळीवर जनजागरण मोहिमेत तिन्ही प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गावातील नागरिकांना लस घेण्यास प्रोत्साहन देत आहे. यामुळे तालुक्यातील एक लाख ३४ हजार ९८० नागरिकांपैकी ४५ वर्षांवरील ३९ हजार ३३३ जणांचे लसीकरण झाले आहे.

मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यात लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. यामध्ये आरोग्य कर्मचारी फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली व ८ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना व नंतर सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. या पाच महिन्यांत तालुक्यातील चुनाभट्टी आणि भिवकुंड या दोन गावांत १०० टक्के लसीकरण झाले आणि विशेष बाब म्हणजे या दोन्ही गावांत संपूर्ण महामारीत एकही पॅझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. यामुळे कोविडमुक्त गावाचा बहुमान चुनाभट्टी व भिवकुंड या दोन गावाला मिळाला आहे.याशिवाय कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे भडकाम, कोर्टी तुकूम, बामणी (काटवली), काटवली, कळमना (बामणी) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे मोहाडी तुकूम, आसेगाव व विसापूर आरोग्य केंद्रांतर्गत हिंगणाळा, भिवकुंड व चुनाभट्टी या गावात कोरोनाबाधितांची संख्या शून्य आहे. या गावांनी सुरुवातीपासूनच कोरोनाला वेशीवरच रोखले. त्यामुळे बल्लारपूर तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या नऊ गावांची लोकसंख्या दोन हजार ४९३ असून १८ वर्षांवरील एक हजार ७४३ जणांनी लस घेतली आहे, तर व इतर एक हजार २६० जणांचे लसीकरण झाले आहे. आता फक्त ४८३ जणांचे लसीकरण बाकी आहे.

लसीकरण मोहीम जोरात

बल्लारपूर तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३२ गावे येतात. या सर्व गावात लसीकरण मोहीम जोरात सुरू असून, तहसीलदार संजय राईंचवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, तालुक्याचे संवर्ग विकास अधिकारी किरणकुमार धनवडे यांच्यासह गावपातळीवर जनजागरण मोहिमेत तिन्ही प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गावातील नागरिकांना लस घेण्यास प्रोत्साहन देत आहे. यामुळे तालुक्यातील एक लाख ३४ हजार ९८० नागरिकांपैकी ४५ वर्षांवरील ३९ हजार ३३३ जणांचे लसीकरण झाले आहे. प्रत्येक गावात नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या