शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

आता रोजगारयुक्त विकासाचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:37 IST

चंद्रपूर शहर सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने भरारी घेत आहे. विकास कितीही केला तरी पोटाची भूक शमत नाही.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपूरच्या २३१ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने भरारी घेत आहे. विकास कितीही केला तरी पोटाची भूक शमत नाही. यापुढे विकासासोबतच रोजगाराभिमुख विकास हे लक्ष्य असणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी येथे केले.चंद्रपूर जिल्ह्याच्या पुढील ५० वर्षांच्या आवश्यकतेला लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत २३१ कोटींच्या स्वयंचलित पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. या वेळी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, सभागृह नेता वसंतराव देशमुख, सभापती अनुराधा हजारे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, माजी महापोर राखी कंचर्लावार, जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, विजय देशमुख विराजमान उपस्थित होते.चंद्रपूर जिल्ह्याची स्मार्ट शहराच्या योजनांमध्ये समावेश नसला तरी या शहराला स्मार्ट शहरासाठी ठरविण्यात आलेली मानके आपण पूर्ण करू. एकेदिवशी स्मार्ट शहरातील अधिकारीच चंद्रपूर हे स्मार्ट बघण्यासाठी स्वत: येतील, अशा शब्दात ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचा कायापालट करण्याचा निर्धार केला.ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, केंद्र, राज्य व महानगर पालिका प्रशासनाचा वाटा असणाºया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण शहराच्या पुढील ५० वर्षातील पेय जलाचे नियोजन करण्यात येत आहे. १६ नवीन पाण्याच्या टाकी, ५२७ किलोमीटर लांबी असणारी अंतर्गत पाईपलाईन, नवीन पंपींग मशिन आणि केवळ एका स्क्रिनवर कार्यान्वित असणारी स्वयंचलित पाणीपुरवठा योजना हे या अमृत योजनेचे वैशिष्ट्ये आहेत.माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाला २५ डिसेंबर २०१८ रोजी या योजनेचा शुभारंभ व्हावा, असा संकल्पही त्यांनी सोडला. या शहरातील बदल अनुभवताना प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे, या साठी देखील आपण प्रयत्नरत असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. या योजनेसाठी पाण्याचे स्त्रोत्र म्हणून लवकरच आमडी, धानोरा या ठिकाणी बंधारा बांधण्याचे कामही सुरू होईल, असेही स्पष्ट केले.महापौर अंजली घोटेकर यांनी देखील या वेळी उभय नेत्यांचे ही योजना अंमलात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. जनतेला ही योजना पुर्ण सुविधेसह विक्रमी वेळेत देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी केले. संचलन प्रशांत आरवे यांनी केले. कार्यक्रमाला महानगरपालीकेचे सर्व नगर सेवक, पदाधिकारी व शहरातील मान्यवर उपस्थित होते.महाकाली मंदिर व परिसराचा विकास साधणार -हंसराज अहीरकेंद्र असो वा राज्य सरकार चंद्रपूरचा विकासासाठी आमचा भक्कम पाठपुरावा सुरू आहे. अनेक योजना आगामी काळात शहरात येतील. शहराचा चेहरा मोहरा बदलत असून केंद्र शासनामार्फत मंजूर झालेल्या अमृत योजनेतून पाणी पुरवठयाची घडी नीट बसेल, असे प्रतिपादन केंद्र्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी केले. या वेळी महाकाली मंदिर व परिसराच्या विकासासाठी १० कोटी रुपये निधी मंजूर केल्याचेही ना. अहीर म्हणाले. येत्या काळामध्ये चंद्रपूर ते पुणे नवीन रेल्वे सुरू करण्याबाबत आपला प्रयत्न अंतिम टप्यात असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरला अनेक सुपरफास्ट रेल्वेसाठी थांबा मिळणार असल्याचे सूतोवाचही ना. अहीर यांनी यावेळी केले.स्मार्ट शहरांपेक्षाही चंद्रपूर स्मार्ट शहर करूचंद्रपूरचा स्मार्ट शहराच्या यादीत उल्लेख झाला नाही. मात्र या स्मार्ट शहरांना लाजवेल असे चंद्रपूरला स्मार्ट करण्याची ग्वाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. स्मार्ट शहराचा विकास करण्यासाठी जी मानके ठरविली आहे. ती सर्व चंद्रपुरात दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात येईल. इतकचे नव्हे, तर त्याही पुढे जावून या शहराचा विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे. स्मार्ट शहरातील अधिकारी चंद्रपूरला बघायला येतील, ही दृष्टी या विकासात असेल, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. शहरात सर्वत्र एलईडी दिवे लावले जाणार आहे. शहरातील रस्तेही रुंद करण्याची नितांत गरजही ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.