शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर, पोंभुर्णा, सावली नगरपालिकेची अधिसूचना जारी

By admin | Updated: September 29, 2015 02:32 IST

जिल्ह्यातील चिमूर, पोंभूर्णा आणि सावली या तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर परिषदेमध्ये

चंद्रपूर : जिल्ह्यातील चिमूर, पोंभूर्णा आणि सावली या तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्याच्या घोषणेनंतर या तिन्ही ठिकाणच्या निवडणुकीसाठी नगर विकास मंत्रालयाने अधिसूचना जारी केल्यानंतर सोमवारी निवडणूक आयोगाने या ठिकाणच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या नुसार या तिन्ही ठिकाणी येत्या ६ नोव्हेंबरला निवडणुका होत आहेत. तर ७ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या सोबतच राज्यातील अन्य ठिकाणीही निवडणुका होत आहेत.चिमूर जिल्हा घोषित केला जावा आणि या शहराला जिल्हा मुख्यालयाचा दर्जा मिळावा अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. या मागणीसाठी शिवसेनेसह सर्वच पक्षांनी आंदोलने केली होती. दरम्यान चिमूरमध्ये झालेल्या एका समारंभात तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चिमूरच्या ग्रामपंचायतीचे नगर पालिकेत रूपांतर करण्याची घोषणा केली होती. दरम्यानच्या काळात नव्या सरकारने राज्यातील तालुका मुख्यालय असलेल्या शहरांमधील ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रक्रियेत चिमूरसह सावली आणि पोंभूर्णाचही भाग्य उजळले आहे.चंद्रपूरलगतच्या घुग्घुस या औद्योगिक शहरातील ग्रामपंचायतीचे महानगर पालिकेत रूपांतर करण्याची आणि या शहराला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. मात्र यातील एकही मागणी पूर्ण न झाल्याने घुग्घुसकर जनता नाराज आहे.दरम्यान, नव्याने अस्तित्वात येणाऱ्या नगर पालिकांचे कार्यक्षेत्र, वॉर्ड याबद्दल पुरेसा तपशिल जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. मात्र निवडणुका जाहीर झाल्याने आणि अधिसूचना निघाल्याने प्रशासनाची लगबग वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सबंधित अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)