शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

..मग काही तासातच कसा आला होता ‘त्या’ वाघाला मारण्याचा आदेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 10:23 IST

जून २०१७ मध्ये ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून मिळविताना वनविभागापुढे नियमावलीचा अडसर नव्हता काय, हा गंभीर सवाल ‘येडा अण्णा’मुळे पुढे आला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर वाघ मृत्यू प्रकरणतेव्हा एनटीसीएची नियमावली नव्हती?

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पाच दिवसांपासून उपचाराविना विव्हळत असलेल्या ‘येडा अण्णा’ या वाघावर उपचाराकरिता वनविभागाला नॅशनल टायगर कन्झर्वेशन आॅफ अ‍ॅथारिटी (एनटीसीए)ची नियमावली आडवी आली. मग जून २०१७ मध्ये ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून मिळविताना वनविभागापुढे नियमावलीचा अडसर नव्हता काय, हा गंभीर सवाल उपचाराविना तडफडत मरण पावलेल्या ‘येडा अण्णा’मुळे पुढे आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातीलच ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण वनपरिक्षेत्रातील हळदा, पद्मापूर, (भूज), बल्लारपूर व परिसरातील गाव परिसरात वाघाने धूमाकूळ घातला होता. त्या वाघाने पाच जणांचा बळी घेतला होता. यामुळे संबंधित गावकऱ्यांनी रास्ता रोको, धरणे आंदोलन करून वनविभागाला जेरीस आणले होते. गावकऱ्यांनी कायदा हातात घेतला म्हणून ४९ आंदोलनकर्त्या गावकऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून अटक केली होती.या घटनेमुळे विधानसभेचे काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पीडित गावकºयांनी २३ जून २०१७ रोजी चंद्रपूर येथे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या कार्यालय परिसरात ठिय्या मांडला. नंतर शेळके यांना त्यांच्या कक्षात घेराव घातला होता. वाघाला गोळ्या घालण्याचे आदेश प्राप्त होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी कठोर भूमिका आ. वडेट्टीवार यांनी त्यावेळी घेतली होती. अखेर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना वाघाला ठार मारण्याचे आदेश द्यावे लागले होते. हे आदेश प्राप्त करण्यासाठी मुख्य वनसंरक्षकांनी आपल्या कक्षात बसूनच पाठपुरावा केला होता हे विशेष.एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे आदेश मिळविण्यासाठीही समिती गठण करणे बंधनकारक होते. या समितीच्या अहवालानुसारच वाघाला ठार करण्याचे आदेश देता येतात. मग काही तासातच समिती गठित झाली. समितीने तसा अहवाल दिला आणि वाघाला ठार करण्याचे आदेश मिळविले, असे असेल, तर ही किमया वनविभागाने वाघावर उपचार करण्यासाठी साधायला हवी होती. ही बाब ताडोबाच्या पर्यटकांसाठी दिलासा देणारी असती. ‘येडा अण्णाची’ प्रकृती नाजूक होती. वनविभागाने त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, हा सकारात्मक संदेश यातून गेला असता, हा चर्चेचा विषय बनला आहे.

वाघाला मारण्यासाठी नव्हे, तर वाचविण्यासाठी नियमावली?वाघाने एखाद्या परिसरात धुमाकूळ घातला तर त्याला लगेच ठार करण्याचे आदेश दिले जात नाही. वाघाने गावात व गाव परिसरात सात जणांचा बळी घेतल्यानंतरच एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्याला ठार मारण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, अशी जाणकार वन्यजीवप्रेमींची माहिती आहे. ब्रह्मपुरी वनविभागात ‘त्या’ वाघाने धूमाकूळ घातला होता हे खरे असले तरी वाघाचे हल्ले हे जंगल परिसरातील होते. असे असतानाही चंद्रपूर मुख्य वनसंरक्षकांनी वाघाला ठार करण्याचे आदेश एका दिवसातच नव्हे, तर काही तासांतच मिळविले होते. असाच आदेश वाघाच्या उपचारासाठीही मिळविला असता, तर वनविभागावर टीकेची झोड उठली नसती.

टॅग्स :Tigerवाघ