शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

रेलस्थानकावर आता ‘नो बिल नो पेमेंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

‘नो बिल नो पेमेंट’ या उपक्रमाबाबत, जो स्टॉल चालक प्रवाशांना बिल देणार नाही त्यांना रेल्वे प्रवाशी पेमेंट करणार नाही, असा आदेश आहे, असे प्लॅटफार्म क्रमांक १ चे स्टालचालक अशोककुमार शुगवाणी यांचे म्हणणे आहे. याशिवाय प्रत्येक स्टाल चालकाने किती प्रवाशांना बिल दिले, त्या बिलाची छायाप्रत वाणिज्य विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपर पाठविणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देबल्लारशहा रेल्वेस्थानकाचा उपक्रम : वस्तुंच्या मनमानी दराला बसला आळा

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : प्रवाशांच्या सोईसाठी बल्लारशाह रेल्वेस्थानकावरील स्टॉलवरून कोणतीही वस्तू घेतल्यानंतर बिल देण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला. रेल्वेस्थानकावरील प्रत्येक स्टॉलवर बिल देण्याची मशीन ठेवली असून त्याच्या बाजूलाच ‘नो बिल नो पेमेंट’ चा बोर्ड लावण्यात आला आहे.‘नो बिल नो पेमेंट’ या उपक्रमाबाबत, जो स्टॉल चालक प्रवाशांना बिल देणार नाही त्यांना रेल्वे प्रवाशी पेमेंट करणार नाही, असा आदेश आहे, असे प्लॅटफार्म क्रमांक १ चे स्टालचालक अशोककुमार शुगवाणी यांचे म्हणणे आहे. याशिवाय प्रत्येक स्टाल चालकाने किती प्रवाशांना बिल दिले, त्या बिलाची छायाप्रत वाणिज्य विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपर पाठविणे बंधनकारक आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना विकल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या खाद्य पदार्र्थांची किंमत आगाऊ तर घेतली नाही ना याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळते, याकडेही शुगवाणी यांनी लक्ष वेधले.प्रवाशांमध्ये वाढणार जागृतीबल्लारशहा रेल्वेस्थानकावर काही अनाधिकृत विक्रेत्यांकडून विविध प्रकारच्या वस्तु मनमानी दराने विकल्या जातात, अशी तक्रारी प्रवाशांनी केली होती. त्यामुळे हा अन्याय दूर व्हावा आणि रेल्वे प्रवाशांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी रेल्वे प्रशासना ‘नो बिल नो पेमेंट’ हा स्तुत्य उपक्रम सुरू केला. रेल्वे प्रवाशांनी या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि इतरांनाही माहिती दिल्यास जागृतीची व्याप्ती वाढेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

टॅग्स :railwayरेल्वे