शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियन तरूणाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: June 5, 2014 23:55 IST

येथील उद्योजक नितीन पोहणे यांची आर्थिक फसवणूक करणार्‍या पॅट्रीक नोबल या तरूणाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक

फसवणूक: अनेक नावे समोर येण्याची शक्यता ंचंद्रपूर: येथील उद्योजक नितीन पोहणे यांची आर्थिक फसवणूक करणार्‍या पॅट्रीक नोबल या तरूणाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. पॅट्रीक नोबल हा फसवणूक करणार्‍या आंतराष्ट्रीय टोळीचा सदस्य आहे. या टोळीत काही महिलांचाही समावेश असल्याची शंका आहे.पोलिसांनी आरोपीजवळून त्याचा पासपोर्ट व व्हिसा जप्त केला असून ते बनावट तर नाही ना, याचा तपास पोलीस करीत आहेत. या टोळीने देशभरात अनेकांची अशी फसवणूक केली असावी, अशी शंका पोलिसांना आहे. नितीन पोहाणे यांचा वॉटर ट्रिटमेंट प्लांट बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांना मुंबई येथून पॅट्रीक नोबल याने दूरध्वनीवरून संपर्क साधला. आपण अफ्रीकेचे रहिवासी आहोत, असे त्याने पोहणे यांना सांगितले. त्याने वॉटर ट्रिटमेन्ट प्लॅंटबद्दल विचारण केली. त्याच दिवशी डॉ.कोलिन यांचा ई-मेल पोहाणे यांना आला. त्यांनीही त्याच विषयावर पोहाणे यांच्याशी चर्चा केली. मी नोबेल नावाच्या व्यक्तिला तुमच्याकडे पाठवित आहे, असा संदेश त्यांनी इंटरनेटवरून दिला. त्यानंतर काही दिवसांनी स्वत: डॉ.कोलिन यांने पोहाणे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. नोबलचा तुमची फॅक्ट्री दाखवा. पसंत आली तर दोन मीलियन डॉलर तुमच्याकडे पाठवितो. असे पोहाणे यांना सांगितले. मात्र ३0 टक्के रक्कम तुम्ही माझ्या खात्यात जमा करा, असे पोहाणे यांनी डॉ.कोलिन याने सांगितले. आपण राजकारणी असल्याने पैसे खात्यात जमा करता येणार नाही, अशी थापही त्याने मारली. त्यानंतर पॅट्रीक नोबल चंद्रपुरात पोहचला. त्याने पोहाणे यांच्याकडून १0 हजार रुपये घेतले. प्लांटची पाहणी करून तो निघून गेला. त्यानंतर घडलेल्या एकूणच घडमोडी संशयास्पद वाटल्याने पोहाणे यांनी प्रसंगावधान राखले. आपली फसगत होत असल्याची बाब लक्षात येताच, त्यांनी नागपूर येथे जाऊन नोबलला पकडून चंद्रपुरात आणले व पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि ४२0, ४२३, ४७१, ५0६ आणि सायबर कायदा ६६ (अ), ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  (प्रतिनिधी)