भद्रावतीत निधाली दुचाकी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:42+5:302020-12-14T04:39:42+5:30

भद्रावती : तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील नाग मंदिरात स्वामी भद्रनागाला अभिषेक व आरती करण्यात आली. दरम्यान, ...

Nidhali two-wheeler rally in Bhadravati | भद्रावतीत निधाली दुचाकी रॅली

भद्रावतीत निधाली दुचाकी रॅली

भद्रावती : तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील नाग मंदिरात स्वामी भद्रनागाला अभिषेक व आरती करण्यात आली. दरम्यान, नाग मंदिर ते श्री मंगल कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. व्हर्च्युअल रॅली व्हिडिओ द्वारे शरद पवार यांचा थेट संवाद ऐकण्याविषयी जनतेला आवाहन करण्यात आले.

श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शरद पवार यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी वर्च्युअल रॅली व्हिडिओद्वारे थेट संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर, प्रदेश प्रतिनिधी मुनाफ शेख, शहर अध्यक्ष सुनील महाले, कामगार सेना जिल्हाध्यक्ष फय्याज शेख, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. युवराज धानोरकर, दुर्ग विश्वास, साबिया देवगडे, स्वप्नील लांबट,, रवी नागपुरे, प्रफुल थेरे, असलेशा भोयर, रोहन कुटेमाटे, पनवेल शेंडे, रोहित आबिटकर, ॲड. कुणाल पठाडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Nidhali two-wheeler rally in Bhadravati