राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:31 PM2018-05-30T23:31:08+5:302018-05-30T23:31:27+5:30

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ना तेरी है, ना मेरी है, अरे ये सरकार लुटेरी है’ अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी इंधन दरवाढीचा निषेध करून त्यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

NCP Women's Congress demonstrations | राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे निदर्शने

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे निदर्शने

Next
ठळक मुद्देइंधन दरवाढीचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ना तेरी है, ना मेरी है, अरे ये सरकार लुटेरी है’ अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी इंधन दरवाढीचा निषेध करून त्यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. मात्र सत्ताप्राप्तीनंतर याकडे दुर्लक्ष केले. परिणामी महागाईमुळे जनतेचे बजेट कोलमडले आहेत. पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीने उच्चांक गाठला आहे. दिवसागणिक इंधन दरवाढ होत आहे. चंद्रपुरात पेट्रोल ८५.३० रुपये तर डिझेल ७१.६६ रुपये दराने विक्री करण्यात येत आहे. याकडे केंद्र व राज्य सरकारने दखल घेऊन इंधनावरील अवाजवी सेस अधिभार रद्द करावा, अशी मागणीचे निवेदन जिल्हाअधिकाºयांना देण्यात आले. यावेळी इंधन दरवाढीचा निषेध करीत लहान मुलांची खेळण्याची गाडी सरकारला भेट देण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट कोआॅपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष डॉ. रूपाली बोम्मावार, जिल्हासचिव शांताबाई मोटेवाड, मनीषा काकडे, सरस्वती गावंडे, सुमित्रा वैद्य, शुभांगी टॉपरे, माधुरी पांडे, रीता बहाद्दुरे, सिमा बोंडे, ममता गोजे आदी उपस्थित होते.

Web Title: NCP Women's Congress demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.