शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चिक्की घोटाळ्याविरुद्ध राष्ट्रवादीचे भद्रावतीत रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: July 1, 2015 01:24 IST

महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे (पावते) यांना २०६ कोटींच्या चिक्की खरेदीतील भ्रष्टाचारप्रकरणी त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,

भद्रावती: महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे (पावते) यांना २०६ कोटींच्या चिक्की खरेदीतील भ्रष्टाचारप्रकरणी त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन ३० जूनला दुपारी १२ वाजता नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील पेट्रोलपंप चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा सदस्य अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी आमदार बाळासाहेब साळुंखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुनाज शेख, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमर बोडलावार यांच्या नेतृत्वात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन एक तास चालले. यादरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सुटका करण्यात आली. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विशेष न्यायिक आयोगामार्फत चौकशी करुन मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा घेण्याबाबतचे निवेदन तहसीलदार भद्रावती यांच्यामार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.या आंदोलनात जयंत टेमुर्डे वरोरा, प्रदेश सचिव अमित उमरे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, शहर अध्यक्ष सुनिल महाले, निलेश ताजने, सुधाकर रोहनकर, प्रशांत काळे, किशोर पडवे, नरेंद्र सवई, अभिजीत भोगीरवार, नंदकिशोर वाढई, रामभाऊ देवईकर, विजय उमाटे, श्रीनिवास घुसपुल्ला यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)