घरगुती वादातून पत्नीची हत्या, पती गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:28 AM2021-01-20T04:28:04+5:302021-01-20T04:28:04+5:30

वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटा कवलापूर येथील नीशा गजानन ननावरे (३०) ही महिला १७ जानेवारी रोजी आपल्या ...

Murder of wife due to domestic dispute, husband disappears | घरगुती वादातून पत्नीची हत्या, पती गजाआड

घरगुती वादातून पत्नीची हत्या, पती गजाआड

Next

वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटा कवलापूर येथील नीशा गजानन ननावरे (३०) ही महिला १७ जानेवारी रोजी आपल्या शेतात कापूस वेचायला गेली होती. सायंकाळी पत्नी घरी आली नाही म्हणून पती गजानन ननावरे याने कांगावा करून ग्रामस्थांना निशाचा शोध घेण्यास सांगितले. स्वतःही शोध घेऊ लागला. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास शेतातच नीशा मृतावस्थेत आढळली. याबाबत शेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांना संशय येताच पाेलिसांनी गजाननची कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याचे कबूल केले. घरगुती वादावरून निशाच्या डोक्यात दगड घातल्याचे सांगितले. याप्रकरणी निशाचा भाऊ अमोल चौके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन ननावरे याला ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास शेगाव पोलीस ठाण्याचे प्रमुख व व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे करीत आहेत.

Web Title: Murder of wife due to domestic dispute, husband disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.