शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहतूकदारांच्या आवळणार मुसक्या

By admin | Updated: February 26, 2015 00:43 IST

सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे नव्याने बांधलेल्या रस्त्यांची दैना होत आहे. याशिवाय अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

चंद्रपूर : सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे नव्याने बांधलेल्या रस्त्यांची दैना होत आहे. याशिवाय अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आता या जडवाहतुकीवर आळा घालून वाहतूकदारांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक आढळून आल्यास एक रुपया प्रति किलोप्रमाणे तडजोड शुल्क वसूल केले जाणार आहे. याशिवाय जडवाहनांचा परवानाही निलंबित करण्याचा निर्णय आज बुधवारी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. ही कारवाई १ मार्चपासून अंमलात येणार आहे.प्रादेशिक परिवहन विभागाची अधिकारीदेखील उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनाच्या डोळ्यात धूळ घालून क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक केली जात आहे. अलिकडे हा प्रकार चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आता यासंदर्भात करण्यात येणाऱ्या कारवाईच्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करण्याचा गुन्हा वाहनधारकांकडून घडल्यास पहिल्या गुन्हयात १० दिवस निलंबन, दुसऱ्या गुन्ह्यात ३० दिवस निलंबन व तिसऱ्या गुन्ह्यात ५० दिवस परवाना निलंबित करण्यात येणार आहे. वाहन मालकास आपला परवाना निलंबित करावयाचा नसल्यास विभागीय कारवाई अंतर्गत तडजोड शुल्क एक रुपया प्रति किलोप्रमाणे दंड वसूल करावा किंवा अतिरिक्त माल घेऊन जाताना आढळल्यास त्यावर विभागीय कारवाई करावी, असा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला. सदर निलंबनाची कारवाई १ मार्चपासून लागू करण्यात येईल. सदर बैठकीमध्ये योग्यता प्रमाणपत्र विधिग्राहय नसल्यास विभागीय कार्यवाही अंतर्गत तडजोड शुल्क वसुल करण्यासाठी चर्चा करण्यात आली व मान्यतेसाठी सदर प्रस्ताव सवार्नुमते मंजूर करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)योग्यता प्रमाणपत्रही नियमानुसार हवेवाहनधारकांकडे योग्यता प्रमाणपत्र विधिग्राह्य नसल्यास, ज्या तारखेस योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेली आहे, त्या तारखेपासून योग्यता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी प्रत्येक प्रलंबित महिन्याकरिता एक हजार रुपये या प्रमाणे तडजोड शुल्क वसूल केले जाणार आहे. मात्र हे तडजोड शुल्क दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.