शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

आज शाळा बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने 19 डिसेंबर २०१९ ला कॅबिनेट मंत्री एकनाथ शिदे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळाच्या भोंगळ कारभारासंदर्भात व शिक्षकांचे तीन-तीन महिने वेतन न काढण्यासंदर्भात सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते. आश्रमशाळेत कार्यरत शिक्षकांना समाजकल्याण सहआयुक्त प्रसाद कुलकर्णीच्या जाचक त्रासाबद्दलही या निवेदनात माहिती देण्यात आली होती.

ठळक मुद्देसंघटनेतर्फे निदर्शने : आश्रमशाळा अधीक्षकांचे आत्महत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळा पिट्टीगुडा ता. जिवती येथे कार्यरत अधीक्षक एस.एस.पवार यांनी संस्थाचालक, मुख्याध्यापक यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलीे. ही घटना शैक्षणिक क्षेत्रात खडबड उडवून देणारी असून आश्रमशाळा प्रशासनातील भोंगळ कारभार उघड करणारी आहे. दोषींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर संघटना एकत्र येत समन्वय समितीच्या माध्यमातून २७ डिसेंबरला जिल्हाभरातील शाळा बंद करण्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केले आहे. दरम्यान, जि.प. समोर शिक्षकांनी गुरुवारी निदर्शने देऊन मागणीकडे लक्ष वेधले.हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने 19 डिसेंबर २०१९ ला कॅबिनेट मंत्री एकनाथ शिदे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळाच्या भोंगळ कारभारासंदर्भात व शिक्षकांचे तीन-तीन महिने वेतन न काढण्यासंदर्भात सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते. आश्रमशाळेत कार्यरत शिक्षकांना समाजकल्याण सहआयुक्त प्रसाद कुलकर्णीच्या जाचक त्रासाबद्दलही या निवेदनात माहिती देण्यात आली होती. हे निवेदन देवून दोन दिवस होत नाही तोच पवार यांच्या शाळा परिसरात झालेल्या आत्महत्येने या आश्रमशाळेत किती अनागोंदी कारभार माजला आहे, हे स्पष्ट होते. याप्रकरणी गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

टॅग्स :Schoolशाळा