शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या पार्थिवाला मुलींनीच दिला खांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

मृतक सुमित्राबाई यांचा मोठा मुलगा संभाजी उर्फ वामन साळवे हे मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीत मागील अनेक वर्षांपासून सक्रिय कार्य करीत आहे. अनेक पदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी पार पाडली आहे. चळवळीत कार्य करीत असल्यामुळे कोणतेही चांगले काम करण्याची सवय लागते आणि त्यातून चांगले काय, वाईट काय समजण्यास वाव मिळतो. हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे महिलांना अंत्यसंस्कार करण्याच्या विधीत सक्रिय स्थान दिले जात नाही.

ठळक मुद्देरुढी परंपरेला फाटा देत पार पाडले अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील सुमित्राबाई शामराव साळवे (८०) यांचा शनिवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची दोन मुले व एक मुलगी, सून, नातवंड असा परिवार आहे. संपूर्ण आयुष्य आईने मायेची उब दिली. तिचे ऋण फेडणे शक्य नाही. मात्र तिच्या अंतिम प्रवासात तिच्या पार्थिवाला आपणही खांदा द्यावा, अशी इच्छा मुलीच्या मनात आली. आणि तिच्या भावाने रुढी परंपरेला फाटा देत याला संमती दर्शविली. सोबतच आईच्या पार्थिवाला भडाग्नीदेखील मुलीनेच दिला.मृतक सुमित्राबाई यांचा मोठा मुलगा संभाजी उर्फ वामन साळवे हे मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीत मागील अनेक वर्षांपासून सक्रिय कार्य करीत आहे. अनेक पदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी पार पाडली आहे. चळवळीत कार्य करीत असल्यामुळे कोणतेही चांगले काम करण्याची सवय लागते आणि त्यातून चांगले काय, वाईट काय समजण्यास वाव मिळतो. हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे महिलांना अंत्यसंस्कार करण्याच्या विधीत सक्रिय स्थान दिले जात नाही. ते अपवित्र समजले जाते. परंतु सुमित्राबाई यांचा मुलगा संभाजी साळवे हे पुरोगामी विचारांचे वाहक असल्यामुळे त्यांनी आपल्या आईच्या तिरडीला मुलगी मिना कातकडे व कवडुबाई धानोरकर तसेच सुनबाई विना साळवे व सविता साळवे यांना खांदा देण्यास सहमती दर्शवून महिलांनाही अंत्यसंस्कारात स्थान दिले. यावेळी संभाजी साळवे व मारोती साळवे या दोन मुलासह, मुलगी व सुनेनेसुद्धा सुमित्राबाईच्या पार्थिवाला खांदा देऊन चितेला भडाग्नी दिला. त्यामुळे महिलांनाही अंत्यसंस्कार करतेवेळी अंत्यविधी पार पाडण्याची संधी मिळाल्याने समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण झाला. जेवढा हक्क आईच्या, वडिलाच्या तिरडीला खांदा देण्याचा मुलाचा आहे, तेवढाच मुलीचासुद्धा आहे, हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले.साळवे परिवाराने २०१९ मध्ये आपल्या वडिलांचा अंतिमसंस्कार सुद्धा याच पद्धतीने केला होता. समाजाने सुद्धा याच पद्धतीने अंतिम संस्कार करून मनात असलेली भीती घालवावी. तसेच मुलगा आणि मुलगी यात भेद न पाळता समाजात आदर्श निर्माण करावा, असे संभाजी साळवे यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यू