शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

आईची ओळख पटली; बछड्याला सोडण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

२४ एप्रिल २०२० रोजी मूल तालुक्यातील सुशी-दाबगाव येथून वन विभागाने चार महिन्याचा मादी बछडा ताब्यात घेतला होता. जंगलातून भरकटल्यानंतर ताब्यात घेतलेल्या वाघाच्या बछड्याला कोरोनाची बाधा होऊ नये, म्हणून सुरूवातीला घशाचे नमुनेहीे तपासण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, कोरोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्याने वन विभागाने सुटकेचा श्वास घेतला.

ठळक मुद्देदोन्ही वाघिणींचा डीएनए अहवाल प्राप्त : टी २ वाघिणच निघाली बछड्याची आई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जंगलातून भरकटलेल्या बछड्याला त्याच्या आईकडे स्वाधीन करण्यापूर्वी त्या वनक्षेत्रात संचार करणाऱ्या दोन वाघिणींचे डिएनए नमुने वन विभागाने हैदराबाद येथील सेंटर फॉर सेलुल्लर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बॉयोलॉजी (सीसीएमबी) प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. ४० दिवसानंतर मंगळवारी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून टी-२ ही वाघिण बछड्याची आई असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्य प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीच्या मार्गदर्शनानुसार बछड्याला आईकडे स्वाधीन करण्याची तयारी वन विभागाने सुरू केली आहे.२४ एप्रिल २०२० रोजी मूल तालुक्यातील सुशी-दाबगाव येथून वन विभागाने चार महिन्याचा मादी बछडा ताब्यात घेतला होता. जंगलातून भरकटल्यानंतर ताब्यात घेतलेल्या वाघाच्या बछड्याला कोरोनाची बाधा होऊ नये, म्हणून सुरूवातीला घशाचे नमुनेहीे तपासण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, कोरोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्याने वन विभागाने सुटकेचा श्वास घेतला. परंतु, जंगलात सोडल्यास जीवाला धोका असल्याने वन विभागाने त्या वनपरिसरात फिरणाºया दोन वाघिणींचे डीएनए नमुने हैदराबाद येथील सीसीएमबी प्रयोगशाळेत पाठविले होते. नमुने पाठविलेल्या टी २ आणि टी १ या दोन्ही वाघिणींना प्रत्येकी तीन बछडे असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे दोन वाघिणींपैकी बछड्याची आई कोण, हे सिद्ध होण्यासाठी वन विभागाला डिएनए अहवालाची प्रतीक्षा होती. मंगळवारी अहवाल येताच टी २ ही वाघिण बछड्याची आई असल्याचे स्पष्ट झाले.भारतातील पहिलीच घटनावाघिणीपासून बछडे दुरावण्याच्या घटना साधारणत: तराई लॅन्ड, दक्षिण आणि महाराष्ट्रात घडत असतात. आईची शिकार झाली अथवा काही दुघर्टना घडली तरच असा प्रकार घडू शकतो. ज्या क्षेत्रात एखादी वाघिणी असेल तर सहसा तिथे दुसरी वाघिण संचार करीत नाही. सुशी- दाबगाव जंगलात मात्र प्रत्येकी तीन बछडे असलेल्या दोन वाघिणी मिळाल्या. त्यामुळे बछड्याच्या आईची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे, अशी माहिती केंद्रीय वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य किशोर रिठे यांनी ‘लोकमत’ला दिली.मूल तालुक्यातील सुशी-दाबगाव जंगलातून ताब्यात घेतलेल्या बछड्याच्या आईची आता ओळख पटली आहे. आईकडे स्वाधीन करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्याकडे सादर करण्यात आला. पुढील मार्गदर्शनानुसार लवकरच कार्यवाही केली जाणार असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.- ए. एल. सोनकुसरे, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :Tigerवाघ