शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

अन् आभाळातील चांदणे जमिनीवर अवतरले!

By admin | Updated: November 21, 2015 00:47 IST

कापसाला पांढऱ्या सोन्याची उपमा दिली आहे. अनेक नामवंत प्रतिभावान कवी, लेखकांनी भन्नाट कल्पनाशक्तीच्या जोरावर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख कवितेत मांडले.

मजुरांची कमतरता : वेचणीअभावी शेत झाले कापसाचे पांढरे रानप्रकाश काळे गोवरीकापसाला पांढऱ्या सोन्याची उपमा दिली आहे. अनेक नामवंत प्रतिभावान कवी, लेखकांनी भन्नाट कल्पनाशक्तीच्या जोरावर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख कवितेत मांडले. मात्र शेतकऱ्यांची वेदना तसुभरही कमी झाली नाही. मजुरांची वानवा आणि वेचणीअभावी कापूस झाडावर दिवसा लखलखत आहे. त्यामुळे शेत आता कापसाचे पांढरे रान झाल्याने जणू आभाळातील चांदणेच जमिनीवर अवतरल्याचा भास अनेकांना आश्चर्यचकीत करणारा आहे.शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे. परिस्थितीच गुलाब बनून जगणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुणाचीही साथ उरली नाही. शेतात कापूस फुटून आहे. मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला अजुनही प्रारंभ केला नाही. झाडावर पांढरे सोने लोंबकळत पडल्याने कोणत्याही क्षणी कापूस मातीमोल होण्याचा धोका आहे. परंतु, सारी परिस्थितीच शेतकऱ्यांना मारक झाल्याने शेतकरी पार कोलमडून गेला आहे. कापूस वेचणीचे भाव वधारले. मात्र त्या तुलनेत कापसाचे दर वाढले नाही. कापूस वेचणीला मजूरांच्या शोधात शेतकरी गावोगाव भटकंती करीत आहे. परंतु, मजुरांची वानवा असल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पहाटे घरून मजुरांच्या शोधात निघालेला शेतकरी बाप निराश मनाने हताश होऊन रिकाम्या हाताने घरी परतत आहे. तर काही शेतकऱ्यांनी परप्रांतातून मजूर आणून कापूस वेचणी सुरू केली आहे. हा सारा मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. मात्र वर्षभर उसनवारी करून शेतीवर केलेला खर्च एका धर्माधात पाण्यात जाईल, या भितीपोटी शेतकरी स्वत:च कापूस वेचणीच्या कामाला लागला आहे. घरातील चिमुकल्यांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वच कापूस वेचणीच्या कामात गुंतले आहे. कुटूंबातील लहान मुलेही कष्टकरी बापाला कापूस वेचणीसाठी आधार झाली आहेत. कापूस वेचणीसाठी परप्रांतातून आणलेल्या मजूरांना गरजेपोटी अनेक शेतकऱ्यांनी आपल्याच कुटूंबात राहण्याची जागा उपलब्ध करून दिली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या घरी कापूस भरून असल्याने राहण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाही. शेतकऱ्यांच्या शेतात पांढरे सोने उन्हाने लखलखायला लागले आहे. कापूस वेचणीचे दर वाढवूनही मजूर मिळणे कठिण असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पांढऱ्या सोन्याची होत असलेली परवड थांबता थांबायलाही तयार नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मात्र शासकीय यंत्रणेला त्यावर उपाय शोधता आला नाही. कापूस वेचणीला मजुरांची वानवा असल्याने हिरवेगार दिसणारे शेत कापसाने पांढरे झाले आहे. त्यामुळे आभाळातील चांदणेच जमिनीवर अवतरल्याचा भास आश्चर्यचकीत करणारा आहे.