शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

नाणेबंदची अफवा अन् नागरिकांची गैरसोय

By admin | Updated: January 2, 2017 00:51 IST

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटाबंदीमुळे नागरिक मागील ५० दिवसांपासून अगदी

नागरिकांचा सवाल : कोण म्हणतो दहाचे नाणे बंद झाले ? चंद्रपूर : पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटाबंदीमुळे नागरिक मागील ५० दिवसांपासून अगदी मेटाकुटीस आले आहेत. व्यापार, बाजारपेठेत व्यवहार व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच आता दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. सरकारकडून वा प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतीही घोषणा झाली नसताना व्यावसायिकांकडून केवळ अफवांवर विश्वास ठेवून नाणे घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे आता नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावरही परिणाम होत असून नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. चंद्रपूर शहरापासून ग्रामीण भागापर्यंत ही अफवा पसरली आहे. ती कोणी वा कोणत्या उद्देशाने पसरविली, हेदेखील एक कोडेच आहे. मात्र यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील व्यवहार खोळंबले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ नोव्हेंबरला १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. जुन्या नोटा बदलून देण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. या निर्णयामुळे चलण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी बँकेत नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागातील बहुतांश जनतेने आपल्याकडे असलेल्या नोटा बँकेत जमा केल्या. त्या मोबदल्यात दोन हजार रुपयांच्या नोटा मिळविल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या चिल्लरसाठी नागरिकांना शोधाशोध करावी लागत आहे. अशातच आता पंतप्रधानांनी नागरिकांना मागितलेले ५० दिवसही संपले आहेत. तरीही चलनटंचाई व बँकेतील नागरिकांच्या रांगा तशाच कायम आहे. एटीएम केंद्रावरही अशीच परिस्थिती आहे. अनेकांनी बँकांमधून पैसे काढताना दहा रुपयांचे नाणेसुद्धा देण्यात आले. मात्र आता १० रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसरल्यामुळे अनेक व्यापारी व छोटेमोठे व्यावसायिक दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास मनाई करीत आहेत. त्यामुळे नागरिकांजवळ असलेले १० रुपयांच्या नाण्याचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी व्यावसायिकांची समजूत काढण्याचा प्रयत्नसुद्धा केला. मात्र, व्यावसायिक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. दहा रुपयांच्या नाण्याबाबत भ्रामक कल्पना पसरविल्या जात आहे. या सर्व भानगडीत ग्रामीण भागातील जनता भरडली जात आहे. पूर्वीची चलनटंचाई व नाणेबंदीच्या अफवेने व्यवहारावर मोठा परिणाम होत आहे.आता जिल्हा प्रशासनानेच यावर तोडगा काढून वेगाने पसरत चाललेली अफवा थांबवावी व व्यावसायिकांची समजूत काढावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)