अनावश्यक सेवांनी मोबाईलधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:52+5:302021-09-22T04:31:52+5:30
तुकूम परिसरातील नाल्यांची स्वच्छता करा चंद्रपूर : तुकूम परिसरातील विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वॉर्डातील ...

अनावश्यक सेवांनी मोबाईलधारक त्रस्त
तुकूम परिसरातील नाल्यांची स्वच्छता करा
चंद्रपूर : तुकूम परिसरातील विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वॉर्डातील नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. त्यामुळे मनपाने स्वच्छता मोहीम राबवावी.
गावांतील पाणी पुरवठा अनियमित
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत पाणी पुरवठ्याची बोंब आहे. पाण्याच्या टाक्या असून त्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. पाणी पुरवठा योजना मंजूर असतानाही पाणी मिळत नसल्याने अनेक गावातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.
कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची करावी
चंद्रपूर : शहरातील काही प्रभागात रस्त्यावरच कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. महापालिकेने कचराकुंड्यांची संख्या वाढविली. परंतु, नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. त्यामुळे याकडे लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.
निराधार योजनेचे अनुदान मिळालेच नाही
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावात श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान थकीत आहे. परिणामी लाभार्थ्यांना अडचण जात आहे. कोरोनामुळे संकटानंतर आता लाभार्थ्यांना आर्थिक कोंडी होत आहे. लाभार्थी बँकेत दररोज पैशासाठी चक्करा मारत आहेत. मात्र पैसे आले नसल्याने त्यांना गेल्यापावली परत जावे लागते. लॅाकडाऊनमुळे अनेकजण आर्थिक अडचणीत आहेत.