जिवती तालुक्यात वणव्याने लाखोंची वनसंपदा नष्ट

By Admin | Updated: March 13, 2016 00:54 IST2016-03-13T00:54:41+5:302016-03-13T00:54:41+5:30

राजुरा तालुक्यातील चिखली, पाटण, बिटातील, भेंडवी, रेंगेगुडा, उमरीगुडा, चिखली, पुन्नागुडा या गावातील शेत शिवारात मागील तीन ते चार दिवसांपासून...

Millions of forests destroyed by forest in Jivati ​​taluka | जिवती तालुक्यात वणव्याने लाखोंची वनसंपदा नष्ट

जिवती तालुक्यात वणव्याने लाखोंची वनसंपदा नष्ट

हजारो हेक्टर जंगल जळून खाक : मौल्यवान वनस्पती व झाडे जळून खाक
पाटण : राजुरा तालुक्यातील चिखली, पाटण, बिटातील, भेंडवी, रेंगेगुडा, उमरीगुडा, चिखली, पुन्नागुडा या गावातील शेत शिवारात मागील तीन ते चार दिवसांपासून वनवा लागला असून यात लाखोची वनसंपदा जळून खाक झाली. परिसरातील हजारो हेक्टरवरील जंगलाला या आगीने विळख्यात घेतले आहे.
या वणव्याकडे वनविभागाने कमालिचे दुर्लक्ष केले आहे. याचाच फायदा घेत वन तस्करांनी अवैधरीत्या कापलेल्या सागवान व सागवानच्या पाट्या, बिट जाळून ते काळे करून घेतले आहे. चिखली बिटातील पुन्नागुडा, गणेरी येथील जंगलात सागवानीचे मौल्यवान झाडे मोठ्या प्रमाणावर आहे. ती कापून त्यांना थोड्या प्रमाणात जाळुन काळे करून तस्करी करण्यासाठी वापरले जात आहे. मात्र याकडे वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कमालिचे दुर्लक्ष केले आहे. वणव्यामुळे वन्यप्राणीही जंगलातून गावाकडे पलायन करीत आहे. याविषयी वन अधिकारी नैताम यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. ही आग लागली की लावण्यात आली याबाबत शंका व्यक्त करण्यात येत असुन शुक्रवारी वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन आगीच्या घटनेचा पंचनामा केला. (वार्ताहर)

Web Title: Millions of forests destroyed by forest in Jivati ​​taluka