शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अमलनाला धरणातील लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:56 IST

‘जय जवान जय किसान, पाटाच्या पाण्यावर व्हा बलवान’ पाटबंधारे विभागाकडून अशाप्रकारचा संदेश अनेक ठिकाणी लावलेला दिसून येतो. मात्र पाटबंधारे विभागाच्या अनियोजितपणामुळे कालव्यांची नियमित डागडुजी होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणाºया पाण्याचा अपव्यय होत असून लाखो लिटर पाणी नाल्याने बाहेर वाहून जाताना दिसत आहे.

ठळक मुद्देकालव्यांची डागडुजी नाही : सिंचनाचे पाणी नाल्यात

आशीष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : ‘जय जवान जय किसान, पाटाच्या पाण्यावर व्हा बलवान’ पाटबंधारे विभागाकडून अशाप्रकारचा संदेश अनेक ठिकाणी लावलेला दिसून येतो. मात्र पाटबंधारे विभागाच्या अनियोजितपणामुळे कालव्यांची नियमित डागडुजी होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय होत असून लाखो लिटर पाणी नाल्याने बाहेर वाहून जाताना दिसत आहे.कोरपना तालुक्यात अमलनाला व पकडीगुड्डम असे दोन सिंचनाचे प्रकल्प असून शेकडो हेक्टर शेतीचे सिंचन या दोन्ही धरणावर अवलंबून आहे. मात्र पाटबंधारे विभागाचे शेतकऱ्यांच्या सिंचनाकडे पूर्णत: दुर्लक्ष असून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, याकरिता पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. उन्हाळ्यामध्ये नियोजन करून फुटलेले कालवे व्यवस्थित करणे, अनावश्यक पाणी वाहून जात असलेल्या ठिकाणी सुधारणा करणे, शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांची समस्या समजून घेणे यापैकी कोणतीही गोष्ट करताना पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आढळत नाही. शेतकरी आणि पाटबंधारे विभागाचे कर्मचारी यांचा संवाद संपल्यामुळे अशाप्रकारे पाटाच्या पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. कोरपना तालुका हा कापूस, सोयाबीन, गहू, तुरी, मिरची अशा विविध पिकांसाठी प्रसिद्ध असला तरी अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही सिंचनाची व्यवस्था नाही. निसर्गाच्या कृपेने अमलनाला व पकडीगुड्डम या धरणामुळे सिंचनाची व्यवस्था होईल, या आशेने असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी नेहमी निराशाच येते.शेतापर्यंत पाटाचे पाणी पोहोचत नाही. मध्येच कालवे लिकेज होतात. काही शेतकऱ्यांनी बांध टाकून पाट फोडून टाकले. मात्र अशा शेतकऱ्यांवर पाटबंधारे विभागाकडून कधीही कारवाई झाल्याचे ऐकण्यात नाही.गडचांदूरकडून बिबी मार्गे नांदा जाणाऱ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाटाचे पाणी वाहत आहे. बिबी येथे असणारा बंधारा पूर्ण भरला असून पावसाळ्याचे पाणी असल्यासारखी स्थिती नाल्यामध्ये पाटाच्या पाण्यामुळे दिसून येत आहे. हेच पाणी शेतकऱ्यांना शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था करून देण्याकरिता उपयोगी आले असते तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा झाला असता. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.गडचांदूर पाटबंधारे विभागाचा पाट आमच्या शेतापर्यंत पोहोचला आहे. मात्र पाटाचे पाणी पोहोचले नाही. सर्व पाणी बाहेर वाहून चालल. मात्र आमच्या शेताला पाणी नाही. त्यामुळे शेत कोरडे पडून पिकांचे नुकसान होत आहे.- पंडित ढवस शेतकरी, बिबी