शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीने सभा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2015 01:02 IST

सभेच्या कामकाजात सहकार्य करणाऱ्या आस्थापना विभागातील कर्मचारी रजेवर गेल्याने शहर विकासाच्या मुद्यावर आयोजित...

आरोप-प्रत्यारोप : विकासाच्या मुद्यांवरील चर्चा टळलीमूल : सभेच्या कामकाजात सहकार्य करणाऱ्या आस्थापना विभागातील कर्मचारी रजेवर गेल्याने शहर विकासाच्या मुद्यावर आयोजित सर्वसाधारण सभा रद्द करण्याची नामुष्की येथील नगराध्यक्षांवर ओढवली. हा प्रकार गुरुवारी येथील नगर परिषदेत घडला.शहराचा विकास आणि जनतेची कामे लक्षात घेता नगराध्यक्षा लीना थेरकर यांनी पालिकेतील वेगवेगळे विभाग व योजनांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी दुपारी १ वाजता पालिका सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. ही सभा १३ आॅक्टोबर रोजी होणार होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ती गुरुवारी घेण्यात येणार असल्याची सूचना नगराध्यक्ष थेरकर यांनी सर्व नगरसेवकांना दिली होती. त्यानुसार सत्तारुढ आणि विरोधक गटातील १७ नगरसेवक सभेला उपस्थित होते. नियमानुसार सभेकरिता आवश्यक कोरम १७ पैकी १७ झाल्याने नगराध्यक्षांना सभाध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज चालविण्यास कोणतीही अडचण नव्हती. कार्यालयीन कामकाजाकरिता मुख्याधिकारी रवींद्र ढाके मुंबईला गेले असले तरी पालिकेचे आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा व इतर विभागातील बहुतांश कर्मचारी उपस्थित होते. परंतु सभा कामकाजात सहकार्य करणारे, सभा इतिवृत्त व टिपण लिहिणारे आस्थापना विभागातील संबंधित कर्मचारी ऐनवेळेवर रजेवर गेल्याने सभेचे कामकाज चालविण्यास नगराध्यक्षा अडचणीत सापडल्या. शेवटी शहर विकासाच्या संदर्भात चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षांना रद्द करणे भाग पडले.आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक सभा कोरमअभावी तहकूब होत होत्या. परंतु यावेळेस प्रथमच १५ दिवसांपूर्वी आयोजित सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष रिना थेरकर यांना संबंधित कर्मचाऱ्यांअभावी ऐनवेळेवर रद्द करावी लागल्याने नगरसेवक बाबा अझीम यांनी नगराध्यक्षांच्या या कृतीचा निषेध नोंदविला आहे तसेच सभागृह आणि पालिकेचे कामकाज चालविण्यास सक्षम आणि पात्र नसलेल्या नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, नगरसेवक अझीम यांची मागणी निराधार असून बिनबुडाचे आरोप करणाऱ्या नगरसेवक बाबा अझीम यांनी आपला स्वार्थ साधण्याच्या हेतूने आस्थापना विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांना सभाकाळात उपस्थित न राहण्याची धमकी दिली असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच संबंधित कर्मचारी ऐनवेळेवर रजेवर निघून गेले अन्यथा कालपर्यंत नियमित असलेले कर्मचारी सभेच्या दिवशी रजेवर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत व्यक्त करीत सदर प्रकाराची चौकशी करणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्ष थेरकर यांनी दिले.यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. एकंदरीत प्रत्येक वेळेस सदस्यांच्या गैरहजेरीमुळे तहकूब होणाऱ्या सभा प्रथमच कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रद्द झाल्याने सदर प्रकाराची पालिका वर्तुळात चर्चा रंगत आहे. (तालुका प्रतिनिधी)