शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:51 IST2021-02-06T04:51:17+5:302021-02-06T04:51:17+5:30

चिमूर : मुख्याध्यापक संघ, शिक्षक भारती आणि चंद्रपूर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना ...

Meet the demands of teachers, non-teaching staff | शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा

चिमूर : मुख्याध्यापक संघ, शिक्षक भारती आणि चंद्रपूर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यातर्फे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांना विविध मागण्या सोडविण्यासाठी संयुक्तपणे निवेदन देण्यात आले.

निवडणूक कार्यात व्यस्त असताना अपघाती निधन झालेले श्री साईबाबा विद्यालय आमडी(बे.)चे लिपिक प्रदीप पुंडलिकराव झाडे यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेणे, त्यांची विमा रक्कम तातडीने जमा करणे, निवडणूक कार्यक्रमात सहभागी पथकांना मेहनताना तातडीने अदा करणे, निवडणूक कार्यक्रमाच्या संचालनासाठी सेवा संलग्नित केलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना भारमुक्त करणे या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर, मुख्याध्यापक संघाचे सचिव विनोद पिसे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर वासेकर, शिक्षक भारतीचे संजय बरडे उपस्थित होते.

Web Title: Meet the demands of teachers, non-teaching staff