शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळनंतर चंद्रपुरातील बाजारपेठा झाल्या कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात भरणारा आठवडी बाजार शंभर टक्के बंद ठेवण्यात प्रशासनाला यश आले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या आदेशांची कडक अंमलबजावणी ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रिता उराडे तसेच मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद प्रशासनाने सुरू केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाभरातील दुकानेही बंद : रस्त्यावरील वर्दळ झाली कमी

बल्लारपुरात शुकशुकाटबल्लारपूर : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून त्याचा संसर्ग टाळण्यासाठी बल्लारपुरातील चौकाचौकात नगर परिषदेच्या वतीने जनजागृतीचे पोस्टर लावले आहे. हॅन्ड वॉशचे कॉउंटर सुरु केले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंतच बाजारपेठमधील दुकाने सुरु असल्यामुळे ६ वाजताच्या नंतर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.ब्रह्मपुरीचा आठवडी बाजार भरलाच नाहीब्रम्हपुरी : कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात भरणारा आठवडी बाजार शंभर टक्के बंद ठेवण्यात प्रशासनाला यश आले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या आदेशांची कडक अंमलबजावणी ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रिता उराडे तसेच मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद प्रशासनाने सुरू केली आहे. ब्रह्मपुरी शहरात आठवड्यात शुक्रवार व मंगळवार दोन वेळा बाजार भरतो. मात्र शुक्रवारी शहरातील आठवडी बाजार शंभर टक्के बंद राहिला. तसेच बाजारपेठ सुद्धा पूर्णत: बंद ठेवली. शुक्रवारचा आठवडी बाजार बंद राहिल्याने मंगळवारी भरणारा बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवरसुद्धा काळजी घेतल्या जात असून अनेकांनी बाजारात येणे टाळले.शंकरपुरात सर्वत्र बंदशंकरपूर : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात १४४ धारा लागू करण्यात आली. त्यामुळे शंकरपूर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन सर्व व्यापारपेठ बंद केली. ही व्यापारपेठ ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज गावात फार्गीग मशीनद्वारे फवारणी करण्यात आली तर येथे दोन मिरची सातरे आहे. या मिरची सातऱ्यावर शेकडो मजूर काम करतात. त्यामुळे या सातरी मालकांना नोटीस देऊन बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मागील दोन दिवसांपासून खर्रा व पान टपरी दुकाने बंद होती. जीवनोपयोगी आवश्यक असलेले किराणा दुकान मेडिकल स्टोर्स सुरू ठेवण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी केली रेल्वेस्थानकाची पाहणीचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना (कोवीड-१९) या विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी चंद्रपूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनेसंदर्भात तसेच रेल्वे स्थानकाची स्वच्छता, जनजागृती विषयक पोस्टर, फलके, मदत कक्षाची पाहणी केली. रेल्वे स्थानकावर येणाºया सर्व प्रवाशांची त्याच ठिकाणी नोंदणी करावी, प्रवाशांना विषाणूबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे व रेल्वे स्थानकावर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचनादेखील जिल्हाधिकारी यांनी स्टेशन मास्तर के.एस.एन.मूर्ती यांना दिल्या.मदत कक्षाची केली पाहणीरेल्वे स्थानकावर इतर जिल्ह्यातून मोठया संख्येने प्रवासी येत आहे. अशा प्रवाशांना जर सर्दी, खोकला असे लक्षणे आढळून आल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन व प्रवाशांची माहिती याविषयीचे मदत कक्ष चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत रेल्वे स्थानकावर स्थापन केले आहे. या मदत कक्षाचीदेखील पाहणी जिल्हाधिकारी यांनी दिली. दरम्यान, बाहेर जिल्ह्यातून किंवा इतर राज्यातून आलेल्या प्रवाशांबाबतही इत्यंभुत माहिती घेण्यात येणार आहे.लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुरुवारपासून चंद्रपुरातील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंतच उघडण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू होती. मात्र शुक्रवारी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्याने शुक्रवारी सायंकाळी ६ वाजतानंतर सर्व दुकाने कुलूपबंद झाली. दरम्यान जमावबंदी कायदा लागू असल्याने चंद्रपुरातील रस्त्यावर व चौकाचौकात फारशी वर्दळ दिसली नाही. दरम्यान, रेल्वेस्थानकाबाबतही जिल्हा प्रशासन गंभीर झाले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. प्रवाशांनी एक मीटर अंतर राखूनच रेल्वे तिकीट घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार