शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चारगावचे तत्काळ पुनर्वसन करा

By admin | Updated: February 26, 2015 00:47 IST

तालुक्यातील चारगाव या गावाला वेकोलिच्या ब्लास्टींगमुळे धोका निर्माण झालेला आहे. याचा प्रत्यय चारगाव येथील एका १५ वर्षीय मुलीचा भिंत कोसळून दुर्दैवी अंत झाल्याच्या दुर्घटनेतून आला आहे.

भद्रावती : तालुक्यातील चारगाव या गावाला वेकोलिच्या ब्लास्टींगमुळे धोका निर्माण झालेला आहे. याचा प्रत्यय चारगाव येथील एका १५ वर्षीय मुलीचा भिंत कोसळून दुर्दैवी अंत झाल्याच्या दुर्घटनेतून आला आहे. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन शक्य तेवढ्या लवकर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दखल घेवून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, तहसीलदार व वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सर्व्हेक्षण करावे, असे निर्देश केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. खासदार हंसराज अहीर यांनी २२ फेब्रुवारी रोजी चारगाव गावाला येथे भेट देवून धोकादायक स्थितीत असलेल्या घरांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत वेकोलि माजरी क्षेत्राचे महाप्रबंधक आभा सिंह, भद्रावतीचे नायब तहसीलदार गोंड व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या भेटीदरम्यान त्यांनी चारगाव या गावाचे तातडीने पुनर्वसन करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, तहसिलदारांनी परिस्थितीची पाहणी करून तसा अहवाद प्रशासनाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी भिंत कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या सुवर्णा धानकी या शाळकरी मुलीच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता आपण प्रयत्न करू असे, आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी चारगाव येथील अनेक नागरिकांनी आपल्या व्यथा मंत्री महोदयांकडे मांडल्या. यावेळी जि.प. सदस्य विजय वानखेडे, रवि नागपुरे, नरेंद्र जीवतोडे, प्रविण सातपुते, वसंत सातभाई, सुर्यकांत गौरकार, बबलु सय्यद व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)