शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणामुळे मूल नगर पालिकेत येणार महिलाराज

By admin | Updated: October 17, 2016 00:46 IST

मूल नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छुक पुरुष मंडळींचा चांगलाच हिरमोड झाला

राजकीय मोर्चेबांधणी : नगराध्यक्षपदासाठी महिला उमेदवारांचा शोधमूल : मूल नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छुक पुरुष मंडळींचा चांगलाच हिरमोड झाला आहे. अनेकांनी आपल्या अर्धांगिनींना पुढे करण्याचा विचार केला आहे. तर काही महिला स्वत:हूनच राजकीय रणांगणात उडी घेऊन या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. सर्वच निवडणूकीकरिता राजकीयदृष्ट्या संवेदनशिल असलेल्या मूल नगर परिषदेची आगामी निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असे निश्चित झाले होते. त्यानुसार मूल नगरातील सत्ताधारी भाजपा पक्षातील दिग्गज उमेदवार मलाच नगराध्यक्षाची तिकीट मिळणार म्हणून निवडणूकीच्या तयारीला लागले होते. विरोधी बाकावरुन सत्ताधाऱ्यांना सभेमध्ये जेरीस आणणाऱ्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनीही आगामी निवडणुकीचे सुखद स्वप्न पाहणे सुरु केले होते. एवढेच नव्हेतर सत्तापक्षातील नगरसेवकांचे मतभेद व विकासातील निष्क्रियता चव्हाट्यावर आणणे सुरु केले होते. परंतु थेट नगराध्यक्षांच्या निवडणुकीचे आरक्षण उशिरा जाहीर झाल्याने शर्यतीत असलेल्या पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते आता आपल्या अर्धांगिनींना पुढे करणार काय, अशी चर्चा मूल नगरात रंगायला लागली आहे.थेट नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला संवर्गाकरिता आरक्षित असल्याने रिंगणात कोणत्याही जातीधर्माची महिला रिंगणात उतरु शकते. यासाठी सत्ताधारी भाजपानेही उमेदवार शोधणे सुरु केले असून उमेदवारीचा अंतीम चेंडू जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हाती राहणार आहे. तर विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस पक्षानेही नगराध्यक्ष पदावर कोण उमेदवार पुढे येणार, याची चाचपणी सुरु केली असून काँग्रेसच्या उमेदवारांची धूरा काँग्रेसचे युवा नेते चंद्रपूर जि.प.चे माजी अध्यक्ष तथा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संतोष रावत यांच्याच खांद्यावर राहील असेही बोलले जात आहे. कारण रावत यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने आपले बहुमत नुकतेच सिद्ध केले आहे. काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्ष तयारीनिशी उतरत असले तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय यांनीसुद्धा आपल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन उमेदवार शोधणे सुरु केले आहे. मागील पाच वर्षात भाजपाच्या हातात सत्तासुत्रे होती. सक्षम नेतृत्वही ना. सुधीर मुनगंटीवार यांचे होते आणि नगराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली होती. त्यानुसार मूल नगर विकासाच्या मार्गावर धावायला पाहिजे होते. परंतु बहुमतात असलेल्या भाजपाच्या नगरसेवकांचे ढिसूळ नियोजन विकासाला बाधा निर्माण करीत राहिले, हे चित्र प्रत्यक्ष मूल नगरातील जनतेने अनुभवले आहे. म्हणून मूलची जनताही यंदा कुणावर विश्वास ठेवते, हे प्रत्यक्ष निवडणुकीतच कळणार आहे. भाजपाला निष्क्रीय ठरवत त्याचाच फायदा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न हवा तसा यशस्वी ठरला नाही. परंतु निवडणुक प्रचार कार्यात सत्ताधाऱ्यांचे काही मुद्दे बाहेर निघू शकतात. त्यामुळे सत्ता पक्षातील जुन्या नगरसेवकांवर भाऊंचा विश्वास किती राहणार आणि कोणाला रिंगणात ठेवणार, हे येणारी वेळच सांगणार आहे. परंतु बहुतेक नवीन उमेदवार देणार, अशी चर्चा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे. नगराध्यक्षांची थेट निवडणूक असल्याने निवडणुकीच्या रिंगणात पुढे येणारे सर्वच पक्षातील कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)