माहेश्वरी समाजाचा 'संघटना आपल्या दारी' उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:24 IST2021-02-08T04:24:31+5:302021-02-08T04:24:31+5:30

नागभीड : विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे संघटना आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागभीड येथे आगमन झाले. यावेळी निवर्तमान अध्यक्ष मदनलाल ...

Maheshwari Samaj's 'Sanghatana Aaplya Dari' initiative | माहेश्वरी समाजाचा 'संघटना आपल्या दारी' उपक्रम

माहेश्वरी समाजाचा 'संघटना आपल्या दारी' उपक्रम

नागभीड : विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे संघटना आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागभीड येथे आगमन झाले.

यावेळी निवर्तमान अध्यक्ष मदनलाल मालपानी, अध्यक्ष रमेशचंद्र चांडक,सहमंत्री रमण हेडा, अजय भट्टड उपस्थित होते.

यावेळी या सर्व अतिथींचे सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माहेश्वरी महासभेकडून संचालित होत असलेल्या संस्था आणि योजनांची माहिती यावेळी देण्यात आली आणि सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी रमेशचंद्र काबरा, किशोरीलाल भट्टड, विनोद मेहता, विजय काबरा, मनमोहन कलंत्री, दर्पण भट्टड, वैभव मेहता, आनंद काबरा, शंकरलाल सारडा, लक्ष्मी मेहता,विनया काबरा, कल्पना मुंदडा यांची उपस्थिती होती. संचालन अजय काबरा यांनी केले.

Web Title: Maheshwari Samaj's 'Sanghatana Aaplya Dari' initiative