किडनी विकल्यानंतर आता इच्छा मरणाची परवानगी मागितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 07:36 IST2026-04-04T07:35:14+5:302026-04-04T07:36:51+5:30

पालकमंत्री, आमदार व प्रशासकीय यंत्रणेने कुळे यांना न्याय मिळवून देण्याचे जाहीर केले होते.

Maharashtra Farmer Who Sold Kidney to Pay Off Debt Seeks Permission for Euthanasia | किडनी विकल्यानंतर आता इच्छा मरणाची परवानगी मागितली

किडनी विकल्यानंतर आता इच्छा मरणाची परवानगी मागितली

नागभीड (चंद्रपूर) : कर्जाच्या परतफेडीसाठी सावकारांच्या जाचापोटी स्वतःची किडनी विकावी लागलेल्या मिंथूर येथील रोशन शिवदास कुळे या शेतकऱ्याने इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. तसे पत्रही त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

रोशन कुळे या शेतकऱ्याने कर्जापोटी घेतलेल्या एक लाख रुपयांचे तब्बल ७४ लाख रुपये सावकारांना मोजून दिले. कर्जाची परतफेड एवढ्यानेच भागली नाही म्हणून सावकारांनी या शेतकऱ्याला किडनी विकण्यास बाध्य केले, असा आरोप आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर सर्वत्र हे प्रकरणाचे धागेदोरे विदेशासह देशभर पसरल्याचे तपासात पुढे आले. ही घटना उघडकीस येऊन आता साडेतीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. दरम्यानच्या काळात या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलनही झाले. पालकमंत्री, आमदार व प्रशासकीय यंत्रणेने कुळे यांना न्याय मिळवून देण्याचे जाहीर केले होते.

Web Title : किडनी बेचने वाला किसान अब इच्छामृत्यु की मांग कर रहा है

Web Summary : भारी कर्ज चुकाने के बावजूद लगातार कर्ज से जूझ रहे, एक किसान, जिसे कथित तौर पर अपनी किडनी बेचने के लिए मजबूर किया गया था, अब सरकार से इच्छामृत्यु की अनुमति मांग रहा है, क्योंकि कोई न्याय नहीं मिला। इस मामले से आक्रोश और जांच हुई, लेकिन किसान अभी भी बेताब है।

Web Title : Farmer Who Sold Kidney Now Seeks Euthanasia Permission

Web Summary : Facing relentless debt despite paying exorbitant amounts, a farmer who was allegedly forced to sell his kidney is now seeking euthanasia permission from the government after no justice was served. The case sparked outrage and investigations, but the farmer remains desperate.