शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मदरशातील बालिकेचा विनयभंग

By admin | Updated: November 8, 2014 22:34 IST

स्थानिक जमनजेट्टी परिसरातील मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका १४ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मदरसा कमिटीचा अध्यक्ष तथा काँग्रेस कार्यकर्ता फारूख सिद्धीकी याला शुक्रवारी रात्री

चंद्रपूर : स्थानिक जमनजेट्टी परिसरातील मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका १४ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मदरसा कमिटीचा अध्यक्ष तथा काँग्रेस कार्यकर्ता फारूख सिद्धीकी याला शुक्रवारी रात्री शहर पोलिसांनी अटक केली. ही घटना उजेडात आल्यानंतर आरोपीला आमच्या हवाली करा, अशी मागणी तेथे उपस्थित जमावाने केली. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता. या प्रकरणी पोलिसांनी फारूख सिद्धीकीविरुद्ध भादंवि ३५४ (अ), बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियम ७/८, ९/१० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शनिवारी आरोपी फारूख सिद्धीकीला न्यायालयापुढे उभे केले असता, त्याला १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपी फारूख हा मदरसा कमिटीचा अध्यक्ष असून त्याने केलेल्या या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. तक्रारीनुसार, तीन दिवसांपूर्वी फारूखने मदरशात जाऊन तेथील एका मुलीला खोलीत बोलाविले व तेथे तिचा विनयभंग केला, असा आरोप आहे. काल मुलीचे नातलग भेटण्यासाठी आल्यानंतर तिने त्यांना आपबिती सांगितली. घडलेल्या प्रकाराने संतप्त झालेल्या नातलगांनी ही घटना मदरसा कमिटीच्या सदस्यांच्या कानावर घातली. सदस्यांनी याबाबत फारूखला जाब विचारला असता, त्याने आरोप नाकारण्याचा प्रयत्न केला. ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरताच, काल रात्री ८.३० वाजता शेकडो नागरिक मदरसा परिसरात दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी फारूख सिद्धीकीला अटक केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी ‘आरोपीला आमच्या ताब्यात द्या’ अशी मागणी केल्याने तणावात चांगलीच भर पडली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. (प्रतिनिधी)