शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील विहीर खचून लाखोंचे नुकसान

By admin | Updated: October 5, 2014 23:01 IST

येथून आठ किमी अंतरावर असलेल्या आक्सापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतशिवारातील विहीर पाण्याच्या एकाएक उफाळ्यानंतर खचून गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून दोन हेक्टर मधील

वेदांत मेहरकुळे - गोंडपिपरीयेथून आठ किमी अंतरावर असलेल्या आक्सापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतशिवारातील विहीर पाण्याच्या एकाएक उफाळ्यानंतर खचून गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून दोन हेक्टर मधील पिकाला धोका निर्माण झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.भूगर्भातील समतोल बिघडून सदर प्रकार घडल्याचा अंदाज परिसरातील शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. तालुक्यातील आक्सापूर येथील शेतकरी बाबुराव वारलु गव्हारे यांचे चंद्रपूर मार्गावर दोन हेक्टर १७ आर. शेत आहे. शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास बाबुराव गव्हारे यांचा मुलगा चंद्रजित गव्हारे हा धान पिकाला पाणी करण्यासाठी गेला असता, विहीरीच्याकडेला ठेवलेली आईल इंजिन सुरु असतानाच विहीरीतील पाण्याने एकाएक उफाळा मारुन विहिरीच्या तोंडीवर अंदाजे पाच फूट उंचीवर दाब मारत पाणी लगेच खाली गेले. हा प्रकार बघण्यासाठी चंद्रजितने आईल इंजिन जवळ जाताच पाण्याच्या उफाळ्याचा दाब कमी होवून पाण्याने विहीरीची दगडी तोंडी व आईल इंजिन तसेच इतर साहित्य विहिरीत जमीनदोस्त झाले. तर केवळ दोन फूट अंतरावर असलेल्या चंद्रजितच्या पाया जवळीलही जमीन खचली. मात्र तो थोडक्यात बचावला. असा प्रकार तालुक्यात प्रथमच घडला असून शनिवारी आक्सापूर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी बाबुराव गव्हारे यांचे शेत गाठून बुडबुडे पाहण्यासाठी गर्दी केली. यावर्षी अल्पवृष्टीमुळे तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना, बाबुराव गव्हारे यांनी ग्रामीण बँकेतून ९० हजार रुपयाचे कर्ज घेवून दोन हेक्टर १७ आर. क्षेत्रात भात पीक घेण्याचे ठरविले. मात्र विहिर खचल्यामुळे या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून जवाहर योजनेअंतर्गत मंजूर विहिर बांधकामात त्यांनी मजबुतीसाठी मंजुर निधी पेक्षा अधिक गुंतवणूक केल्याचे सांगितले. विहीर खचल्याने शेतातील धान पिकांना पाण्याअभावी धोका निर्माण झाला असून २० हजार रुपयाची आईल इंजिनही जमीनदोस्त झाल्याने गव्हारे हे आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याची प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी. (तालुका प्रतिनिधी)