शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या धर्तीवर जिल्ह्यात अंगणवाड्या निर्माण करणार

By admin | Updated: October 18, 2015 00:57 IST

औरंगाबादच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील आयएसओ प्रमाणित आदर्श अंगणवाड्या निर्माण करण्यात येणार असून ....

सुधीर मुनगंटीवार : १७८ कोटी रुपयांच्या थकीत मानधनाची तरतूद हिवाळी अधिवेशनात करणार चंद्रपूर : औरंगाबादच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील आयएसओ प्रमाणित आदर्श अंगणवाड्या निर्माण करण्यात येणार असून अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनाच्या थकबाकीच्या १७८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद येत्या हिवाळी अधिवेशनात निश्चितपणे करण्याचे आश्वासन वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेतर्फे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात शनिवारी आयोजित अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उदघाटक म्हणून बोलतांना दिले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर होते, तर मंचावर आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कल्पना बोरकर, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, महिला व बालकल्याण सभापती सरिता कुडे, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, महिला बालकल्याण समितीच्या सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या बाल आकार-२०१५ या पुस्तकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.शून्य ते सहा वयोगटातील सर्व मुले कष्टकरी, शेतकरी व शेतमजुरांची असल्याने त्यांना घडविण्याचे मोठे राष्ट्रीय कार्य तुमच्या हाती आहे. या मुलांना गुणवान करा, ही लहान मुले देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे आपण सेवा भावनेने कार्य करावे, असे आवाहन ना.मुनंगटीवार यांनी यावेळी केले. या बालवाडीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे थोर पुरुष होऊ शकतात. अशा लहान मुलामध्ये चांगले विचार व संस्कार घडविण्याचे महान कार्य तुमचे असल्याने ही जबाबदारी आपण ओळखली पाहिजे, असेही ते म्हणाले.जिल्ह्यातील जिवती, पोंभुर्णा व मूल या तालुक्यातील ३२५ अंगणवाडया एका वर्षात उत्तम दर्जाच्या करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील संपूर्ण अंगणवाडयांचा कायापालट करुन त्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षस्थानावरुन बोलताना ना.हंसराज अहीर म्हणाले, ज्या गावात आपण सेवेच कार्य करीत आहात, त्याचे मुल्यांकन कोणीच करु शकत नाही. ग्रामीण भागातील गरीब मुलांना शारीरिक, मानसिकरीत्या सुदृढ करण्याचे काम आपण करीत आहात. या मुलांना चांगला सकस आहार देण्यासाठी केंद्र सकारकडून काही आर्थिक सहकार्य हवे असल्यास तसे चंद्रपूर जिल्ह्यात प्रोजेक्ट तयार करण्यात यावे, असेही ते म्हणाले.आ. शामकुळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी सेविकेचे हे पद लहान असले तरी ते राष्ट्रीय कार्य असल्याने आपले काम महान आहे, असे ते म्हणाले. जिल्हा परिषद उपाध्यक्षा कल्पना बोरकर, महिला व बाल कल्याण सभापती सरिता कुडे व बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांनीही या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले. या कार्यशाळेला जिल्हयातील अंगणवाडी सेविका व मदतनिस मोठया संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)