शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला आजीवन कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2015 01:27 IST

संगीत शिकण्याकरिता आलेल्या ११ वर्षीय मुलीवर संगीत शिक्षकाने लैंगिक अत्याचर केला. या प्रकरणी त्याला न्यायाधिशांनी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.

शिक्षा सुनावताच आली भोवळ : उपचारासाठी रुग्णालयात दाखलवरोरा : संगीत शिकण्याकरिता आलेल्या ११ वर्षीय मुलीवर संगीत शिक्षकाने लैंगिक अत्याचर केला. या प्रकरणी त्याला न्यायाधिशांनी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षा ऐकताच आरोपी शिक्षकाला न्यायालयात भोवळ आल्याने त्याला तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.भद्रावती शहरातील विजय श्रीराम ठाकरे (६६) हा विद्यार्थ्यांना संगीत कलेचे धडे देत होता. १८ एप्रिल २०१४ रोजी भद्रावती येथील ११ वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे सदर शिक्षकाकडे संगीताचे धडे घेण्यास गेली असता, त्या शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मुलीने आपल्या आईला सांगताच, यासंदर्भात सदर शिक्षकाविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यामध्ये संगीत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.तक्रारीवरुन भद्रावती पोलिसांनी आरोपी शिक्षक विजय ठाकरे याच्याविरुद्ध कलम ३७६, २ (फ) (आय) व बालक लैंगिक अत्याचार अधिनियम कलम ३,४,५, ६ नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या घटनेचा तपास वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार, जमादार मनोहर आमने यांनी केला. तपास पूर्ण करून वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील जयंत ठाकरे यांनी दहा साक्षिदारांची साक्ष नोंदविली. वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के.एन. गौतम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर शिक्षक विजय ठाकरे याला बालिकेवर अत्याचार प्रकरणात दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. दरम्यान, न्यायालयाने शिक्षा सुनावताच, आरोपी शिक्षकाला न्यायालय परिसरात भोवळ आली. त्याच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी संगीत शिक्षकास वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. (तालुका प्रतिनिधी)