लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील बाबूपेठ वॉर्डातील श्री बालाजी मंदिराजवळील पाईपलाईनमधून पाणी गळती सुरू असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, याकडे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे दुर्र्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यात अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. चंद्रपूर महानगराचीही परिस्थिती काही वेगळी नाही. यासंदर्भात अनेकदा तक्रारी झाल्या. मात्र, याकडे मनपा प्रशासनाने गांभिर्याने लक्ष दिले नाही. मनपाच्या अखत्यारितील खासगी कंपनीच्या कंत्राटदारामार्फत शहराला पाणी पुरवठा होतो. या कंपनीच्या गलथान कारभारामुळे पाण्याची भीषण समस्या यापूवीर्ही उद्भवल्याची अनेक उदाहरणे आहेत. अलिकडेच पाणी टंचाईचे कारण पुढे करून एक दिवसाआड बाबूपेठ परिसरात पाणी पुरवठा केला जात होता. परंतु, हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असूनही कुठलीही उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत मनपा प्रशासनाचा हा हलगर्जीपणा नागरिकांसाठी मोठी समस्या निर्माण करणारी आहे. पाईप लाईनची गळती अजूनही सुरूच असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
पाईपलाईनमधून गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:19 IST
शहरातील बाबूपेठ वॉर्डातील श्री बालाजी मंदिराजवळील पाईपलाईनमधून पाणी गळती सुरू असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, याकडे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे दुर्र्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पाईपलाईनमधून गळती
ठळक मुद्देमनपाचे दुर्लक्ष : बाबूपेठ परिसरातून हजारो लिटर पाणी वाया