नवतरुणांसह अन्य राजकीय पक्षांचे नेतेही शिवसेनेसाठी उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:33 IST2021-08-21T04:33:07+5:302021-08-21T04:33:07+5:30

युवा सेनेच्या वतीने युवा पदाधिकारी संवाद दौरा सुरू आहे. पुण्यातून या दोैऱ्याला सुरुवात झाली. आतापर्यंत २३ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद ...

Leaders of other political parties including youth are also eager for Shiv Sena | नवतरुणांसह अन्य राजकीय पक्षांचे नेतेही शिवसेनेसाठी उत्सुक

नवतरुणांसह अन्य राजकीय पक्षांचे नेतेही शिवसेनेसाठी उत्सुक

युवा सेनेच्या वतीने युवा पदाधिकारी संवाद दौरा सुरू आहे. पुण्यातून या दोैऱ्याला सुरुवात झाली. आतापर्यंत २३ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. सहावा टप्पा नागपुरातून सुरू झाला. चंद्रपूर हा २४वा जिल्हा आहे. या दौऱ्यात तरुणांचा युवासेनेकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढत तर आहेच; शिवाय इतर राजकीय पक्षांचे नेतेही शिवसेनेच्या वाटेवर आहेत. येत्या काळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील, अशी माहितीही यावेळी वरुण सरदेशपांडे यांनी दिली. शिवसेनेने आता नव्याने आणि मजबूत बांधणीच्या दिशेने वाटचाल केली आहे. यापूर्वी काय झाले यापेक्षा यापुढे काय करायचे याचा रोडमॅपच तयार केलेला असल्याचेही सरदेशपांडे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, युवा सेनेचे अभय होले, रूपेश कदम, राहुल कनाल उपस्थित होते.

Web Title: Leaders of other political parties including youth are also eager for Shiv Sena