शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांना अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:41 IST

प्रभारकरराव मामुलकर यांचे पार्थिव सकाळी ९ वाजतापासून अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. असंख्य चाहत्यांनी आपल्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले. दुपारी ३ वाजता त्यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला.

ठळक मुद्देजनसागर उसळला। शिवाजी स्टेडियमवर अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी तीन वाजता स्थानिक शिवाजी स्टेडियमच्या प्रांगणात अग्निसंस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी सर्व राजकीय पक्षातील नेतेमंडळींसह हजारो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, श्रद्धांजली सभा घेण्यात आली.प्रभारकरराव मामुलकर यांचे पार्थिव सकाळी ९ वाजतापासून अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. असंख्य चाहत्यांनी आपल्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले. दुपारी ३ वाजता त्यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. ्त्यांच्या अंत्ययात्रेत काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार सुभाष धोटे, अ‍ॅड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, देवराव भांडेकर व जैनुद्दीन जव्हेरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब वासाडे, राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, डॉ. रजनी हजारे, नंदा अल्लुरवार, राकांँचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, जिल्हा परिषद सदस्य गोदरू पाटील जुमनाके, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, व्ही. डी. मेश्राम, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुधाकर कुंदोजवार यांच्यासह नेतेमंडळी व हजारो चाहते सहभागी झाले होते.पूर पीडितांना मदतीचा हातमाजी आमदार प्रभाकर मामुलकर यांनी समाजसेवेचा वसा घेऊन सामाजिक व राजकीय जीवनाला प्रारंभ केला होता. तोच वारसा पुढे चालवित त्यांच्या अर्धांगिणी सुमन मामुलकर, सुधीर दौलत नलगे, अविनाश नारायण जाधव, अभिजीत बबन भुते आणि आप्तेष्टांनी गंगा पूजनाचा कार्यक्रम थोडक्यात आटोपून उर्वरित रक्कम पूरपीडितांना मदत म्हणून देण्याचे अंत्यसंस्कारानंतर जाहीर केले.

टॅग्स :MLAआमदारDeathमृत्यू