बल्लारपूरचे दर्शनीय मोठे लाकूड आता बॉटीनिकल गार्डनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:27+5:30

१५.६२१ मीटर लांबीचे हे सागवान जातीतील उत्तम श्रेणीचे भव्य लाकूड आलापल्ली वनक्षेत्रातील बुरकुटगट्टा येथून ८ जून १९५८ ला बल्लारपूर येथे आणले. ते एका सुसज्जीत कक्षात लोकांना बघण्याकरिता ठेवले आहे. आजवर लाखो लोकांनी, देश-विदेशातील पर्यटकांनी या लाकडाच्या भव्यतेबद्दल कुतूहल व आश्चर्य, भेट नोंदीत व्यक्त केले आहे. कुरकुटगट्टा येथे वृक्ष उभे होते. १९५८ ला याची उंची ३० मीटर एवढी होती. वनविभागाचे या वृक्षाकडे विशेष लक्ष होते.

Large view Wood of Ballarpur now in the Botanical Garden | बल्लारपूरचे दर्शनीय मोठे लाकूड आता बॉटीनिकल गार्डनमध्ये

बल्लारपूरचे दर्शनीय मोठे लाकूड आता बॉटीनिकल गार्डनमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देस्थानांतर करण्याचा वनविभागाचा निर्णय

बल्लारपूर : बल्लारपूर येथील कष्टभांडारात (वनडेपो) गेले ६० वर्षांपासून सुरक्षितपणे जपून ठेऊ न असलेले व आपली प्रचंउ लांबी तसेच आकाराच्या भव्यतेने लोकांमध्ये कुतूहूलाचा विषय ठरलेले दर्शनिय मोठे लाकूड येथून हलवून ते आता बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावर असलेल्या बॉटीनिकल गार्डन येथे लविण्यात येणार आहे. तसा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
१५.६२१ मीटर लांबीचे हे सागवान जातीतील उत्तम श्रेणीचे भव्य लाकूड आलापल्ली वनक्षेत्रातील बुरकुटगट्टा येथून ८ जून १९५८ ला बल्लारपूर येथे आणले. ते एका सुसज्जीत कक्षात लोकांना बघण्याकरिता ठेवले आहे. आजवर लाखो लोकांनी, देश-विदेशातील पर्यटकांनी या लाकडाच्या भव्यतेबद्दल कुतूहल व आश्चर्य, भेट नोंदीत व्यक्त केले आहे. कुरकुटगट्टा येथे वृक्ष उभे होते. १९५८ ला याची उंची ३० मीटर एवढी होती. वनविभागाचे या वृक्षाकडे विशेष लक्ष होते. १९५८ ला या वृक्षाचे वय २७५ वर्षे होते. त्यावर्षी आलेल्या प्रचंड वादळात हे वृक्ष पडले. त्यातील १५.६२१ मीटर एवढा भाग बल्लारपूरला आणण्यात आला. तेथून येथे आणण्याकरिता १९ दिवस लागले. एक टॅÑक्टर, दोन हत्ती व २५ मंजूर एवढे या कामी लागले. खर्च आला होता ११०० रूपये ! बल्लारपूरात ६० वर्षे मुक्कामी राहिलेले हे आश्चर्यचकीत लाकूड बॉटीनिकल गार्डनमध्ये देश-विदेशी वृक्ष प्रेमी व अभ्यासकांचे लक्ष वेधून घेईल. तशी विशेषत: त्यात आहे.

Web Title: Large view Wood of Ballarpur now in the Botanical Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.