शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

वादळ व अवकाळी पावसामुळे कोरपना तालुक्यात मोठे नुकसान

By admin | Updated: May 13, 2017 00:37 IST

कोरपना तालुक्यातील निमणी परिसरातील गावात गुरूवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे व जोरदार पावसाने गावातील ५० टक्के घरांवरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले.

शेतकऱ्यांनाही फटका : अनेक घरांची अंशत: पडझडलोकमत न्यूज नेटवर्कबाखर्डी :कोरपना तालुक्यातील निमणी परिसरातील गावात गुरूवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे व जोरदार पावसाने गावातील ५० टक्के घरांवरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेत टिनपत्रे उडाल्यामुळे काही जनावरेदेखील जखमी झाली आहेत. वादळासोबतच पावसानेदेखील सुमारे एक तास हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. राजकुमार गौरकार व इतर शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य ओले झाले. अनिल जगताप यांचा कापसाचा ढिग बाहेर असल्याने वादळामुळे उडून गेला तर काही ढिगारे जमीनदोस्त झाले. तुकाराम बांदुरकर यांच्या सुमो या वाहनावर झाड पडल्याने काचा फुटल्या. रेणुका लोखंडे या ८० वर्षीय वृध्देच्या घराचे छप्पर उडाले. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. प्रचंड वेगात वादळ आल्याने अतिशय जुने झाड घरावर कोसळले. या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. गावातील जवळजवळ ५० टक्के लोकांच्या घरांवरील छप्पर या वादळामुळे उडाले. अनेक नागरिकांची मातीची घरे आहेत. वादळ व पावसामुळे या घराच्या मातीच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. गावातील विद्युत खांबसुद्धा वाकल्याने विजेच्या तारा जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे वीज वितरण कंपनीचेही नुकसान झाले आहे.चक्रीवादळामुळे मोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे निमणी-राजुरा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. निमणी, बाखडीॅ, लखमापूर, धुनकी या गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. काही तासानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला. अनेक ग्रामस्थ आपल्या घरावरील उडालेल्या छपराचा शोध घेत होते. अनेकांच्या घरातील टी.व्ही.,फ्रीजसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे नुकसान झाले. या प्रकारामुळे नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेने आपल्या अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करावे व तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अन्यधान्याचे नुकसानचक्रीवादळ व पावसामुळे लोकांच्या घरावरील छप्पर उडाल्यामुळे घरातील साठवून ठेवलेले गहू, तांदूळ व इतर अन्नधान्य ओले झाले. काही मोटरसायकल, सुमो गाडीच्या काचा फुटल्या. बाहेर ठेवलेला शेतकऱ्याचा कापूस वादळामुळे उडून गेला तर काही ओला होऊन जमनीदोस्त झाला. मोठे नुकसान झाले असल्यामुळे शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निमणी, बाखडीॅ, हिरापूर, धुनकी, तळोधी येथील शेतकऱ्यानी केली आहे.