शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्रांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: March 21, 2017 00:39 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भूषणावह नाहीत. देशाचा पोशिंदाच जर खचत गेला तर समाजात भयाण परिस्थिती निर्माण होईल.

मान्यवरांचा सूर : चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलनचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भूषणावह नाहीत. देशाचा पोशिंदाच जर खचत गेला तर समाजात भयाण परिस्थिती निर्माण होईल. शेतकरी माझा आहे. त्यांच्या दु:खाची समरस व्हावे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता भूमिपूत्रांनी समोर यावे, असा सूर रविवारी चंद्रपूर येथे आयोजित अन्नत्याग आंदोलनात उमटला. शेतकऱ्यांप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी येथील किसानपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून अन्नत्याग उपोषण करण्यात आले. याची सांगता रविवारी सायंकाळी इन्स्पायर इन्स्टिट्यूट येथे झाली. किसानपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, रवी झाडे, प्रा. सुरेश चोपणे, उमाकांत धांडे, प्रशांत आर्वे, सचिन भोयर, प्रा. सुनील वडस्कर, प्रणय काकडे, अजय बलकी, पांडुरंग गावतुरे, विनोद थेरे, संतोष ताजणे, नीतेश खामनकर, गजानन नागपूरे, सुधाकर खरवडे, दीक्षांत पथाडे, प्रदीप उमरे, देवानंद वाढई, सुरेश विधाते यांची उपस्थिती होती. १९ मार्च १९८६ ला यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली. राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यानंतर लाखों शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि आत्महत्येला सिलिंगचा कायदा, अत्यावश्यक वस्तूचा कायदा, जमीन अधिग्रहणाचा कायदा जबाबदार आहेत. या कायद्यांचा निषेध व शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी या उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.आपल्या कामाच्या ठिकाणी अन्नत्याग करण्याचे आवाहन किसानपुत्र फाउंडेशनने केले होते. याला प्रतिसाद देत अनेकांनी अन्नत्याग केले. सायंकाळी ५ वाजता इन्स्पायर इन्स्टिट्यूट येथे अन्नत्याग उपोषणाची सांगता झाली. व्यवस्था बदलणार नाही तोपर्यंत परिवर्तन शक्य नाही. त्यामुळे परिवर्तन करण्यासाठी आता भूमिपूत्रांनी समोर यावे. शेतकऱ्यांना जागृत करण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. मान्यवरांची यावेळी भाषणे झाली. शेवटी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली.