शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामाचे अनुदान परत जाणार

By admin | Updated: February 25, 2015 01:21 IST

चालू वर्षातील खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले.

प्रवीण खिरटकर वरोराचालू वर्षातील खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले. अनुदानाचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात येत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक अद्याप दिले नाही, अशा शेतकऱ्यांचे अनुदान ७ मार्चनंतर परत जाणार आहे. त्यामुळे बँक खाते नसलेले अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत.चालू वर्षातील खरीप हंगामात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दुबारा, तिबार पेरणी करावी लागली. त्यातच सोयाबीन पिकाने बहुतांश शेतकऱ्यांना धोकाही दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनुदानाची मागणी केली. त्यानंतर शासनाने प्रति हेक्टर ४५०० रुपये अनुदान जाहीर केले. महसूल विभागामार्फत मागील काही महिन्यापासून अनुदान वाटप सुरू आहे. अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महसूल विभागाने बँक खाते अनिवार्य केले आहे.एकाच सातबारावर एका पेक्षा अधिक नावे असल्यास संमतीपत्र, मृत पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला आदी दस्ताऐवज अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. बहुतांश तालुक्यासाठी १४ ते २० कोटी पर्यंतचे अनुदान आले असून शेतकऱ्यांची संख्या प्रत्येक तालुक्यात ३० हजारापेक्षा अधिक आहे. महसूल विभागाने अनुदानाबाबत जनजागृती केली. मात्र, आजतागत केवळ ५० टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे. उर्वरित ५० टक्के शेतकऱ्यांनी अद्यापही बँक खाते तलाठ्याकडे सादर केली नसल्याची माहिती समोर आली आहे. बँक खाते सादर करण्याकरीता शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली होती. मात्र अनेकांनी खाते क्रमांक सादर केले नाही. त्यामुळे ७ मार्चनंतर अनुदानाची शिल्लक राशी शासनाकडे परत जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)