शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांची कामासाठी केविलवाणी धडपड

By admin | Updated: April 25, 2015 01:31 IST

ताडाळी एमआयडीसी येथील आस्थापनांमध्ये आपल्यालाही नोकरी मिळेल, या आशेवर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील बरेचसे तरूण आस्थापनांमध्ये आपला ‘बायोडाटा’ देत असतात.

वतन लोणे घोडपेठताडाळी एमआयडीसी येथील आस्थापनांमध्ये आपल्यालाही नोकरी मिळेल, या आशेवर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील बरेचसे तरूण आस्थापनांमध्ये आपला ‘बायोडाटा’ देत असतात. मात्र परिसरातील उद्योगांच्या बिकट अवस्थेमुळे फक्त मोजक्याच तरूणांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते. मात्र बऱ्याच उच्चशिक्षित तरूणांना नोकरी न मिळाल्यामुळे त्यांची निराशा होत आहे.तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरूणांची संख्या जिल्ह्यात लाखोंच्या घरात आहे. दरवर्षी तांत्रिक पदवी घेवून पास होणाऱ्या तरूणांची संख्या या संख्येमध्ये भरच घालत असते. महिन्याकाठी ताडाळी एमआयडीसी मध्ये नोकरीसाठी बायोडाटा देणाऱ्या तरूणांची संख्या पाचशेच्या आसपास आहे. मात्र इंजीनियरिंगमध्ये पदविका असूनही तरूणांना एक नोकरी मिळविण्यासाठी देखील केविलवाणी धडपड करावी लागत असल्याचे चित्र आहे.पालक मुलांना लाखो रूपये खर्च करून अभियांत्रिकीच्या पदविकेचे शिक्षण देतात. मुलगा चांगल्या पगारावर नोकरीला लागावा ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठी स्वत:च्या इच्छांना मारून प्रसंगी पैसे कर्जाने काढून पालक मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देतात. मात्र मुलांचे शिक्षण पुर्ण झाल्यावर मुलांना नोकरी मिळविणे खुप कठीण झाले आहे.मनासारखी नोकरी मिळाल्यावर आपले राहणीमान उंचावेल असे बऱ्याचशा अभियांत्रिकी किंवा तत्सम शिक्षण घेतलेल्या तरूणांचे स्वप्न असते. तसेच नोकरी मिळाल्यानंतर लग्न करून जीवन मजेत घालवायचे, असे प्रत्येक तरूणांचे स्वप्न असते. मात्र जिल्ह्यातील एमआयडीसी मध्ये नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील तरूणांची निराशा होत आहे. त्यातच नोकरी नसलेल्या तरूणांना लग्नासाठी मुलीच कुणी देत नसल्यामुळे तरूणांचे सुखी संसाराचे स्वप्नही भंग होण्याच्या मार्गावर आहे.उद्योगांचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याला ओळखले जात असले तरी या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची रोजगारासाठी हेळसांडच होत आहे. परप्रांतीय युवकांना संधी दिली जाते. तर स्थानिकांना डावलले जाते, हा नेहमीचाच अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या उद्योग प्रशासनाप्रती युवकांमध्ये असंतोष पसरला आहे. तक्रार करूनही फायदा होत नसल्याने हताश झालेले युवक विविध मार्गाकडे वळत असून काहींनी उच्च शिक्षण घेऊनही पानटपरी व्यवसाय करीत आहेत. महाराष्ट्रात प्रदुषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तसेच देशात प्रदूषणाच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी २०१० पासून नव्या उद्योगांना बंदी घालण्यात आली आहे. याचे फलित म्हणून जिल्ह्यातल्या प्रदूषणात घट झाली असून आता चंद्रपूर जिल्हा प्रदूषणाच्या बाबतीत देशात सहाव्या क्रमांकावर आला आहे. हा बदल स्वागतार्ह आहे. मात्र बेरोजगारीच्या प्रश्नावरही शासनाने लवकरात लवकर उपाय शोधण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र गेल्या दोन तीन वर्षात शासनाकडून कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाही.