शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दारूसाठी आता काही दिवसांचीच प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हा ५३६ दारूची दुकाने तसेच बार होते. यातील ४६ परवाने इतर जिल्हात स्थानांतरीत झाले. तर ४९० जिल्हात होते. त्यापैकी ३१४ बारचे स्थलांतरण झाले नाही. तर देशी दारूच्या किरकोळ १०६ दुकानांपैकी ८ परवाने तेव्हाच स्थलांतरीत झाले. विदेशी दारूच्या किरकोळ विक्रीच्या २४ दुकानांपैकी १९ दुकानांचे स्थानांतर झाले आहे. या दुकानांचा परवाना नुतनीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, अनेकांनी शासकीय नियमानुसार चालान सुद्धा घेतले असून पुढील प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिरीक्षकांच्या मोका चौकशीनंतर अधीक्षक देणार दुकानांना मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्यानंतर दारू विक्रेते तसेच मद्यपी दारू सुरु होण्याची चातकासारखी वाट बघत आहे. आता मात्र ही वाट काही दिवसांवर आली असून लवकरच दारू दुकाने सुरु होणार आहे. परवाना नुतनीकरणाची प्रक्रीया सुरु झाली आहे. दरम्यान, परिपूर्ण कागदपत्र असलेल्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जागेचा प्रथम मौका चौकशी करणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अधिक्षक दुकाने सुरु करण्याची परवानगी देणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच जिल्ह्यातील दारू दुकाने सुरु होणार आहे.दारूबंदी उठल्यानंतर दारू व्यावसायिकांनी परवाना नुतनीकरणासाठी कागदपत्र गोळा करणे सुरु केले आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने शेकडो परवानाधारकांच्या चुकाच अधिक काढल्यामुळे अनेकांना आल्या पावली परत जावे लागले. दरम्यान शुक्रवारी पुन्हा परवाना नुतनीकरणासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे शेकडो अर्ज अले असून नुतनीकरणाची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हा ५३६ दारूची दुकाने तसेच बार होते. यातील ४६ परवाने इतर जिल्हात स्थानांतरीत झाले. तर ४९० जिल्हात होते. त्यापैकी ३१४ बारचे स्थलांतरण झाले नाही. तर देशी दारूच्या किरकोळ १०६ दुकानांपैकी ८ परवाने तेव्हाच स्थलांतरीत झाले. विदेशी दारूच्या किरकोळ विक्रीच्या २४ दुकानांपैकी १९ दुकानांचे स्थानांतर झाले आहे. या दुकानांचा परवाना नुतनीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, अनेकांनी शासकीय नियमानुसार चालान सुद्धा घेतले असून पुढील प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.जिल्ह्यात २०१५ पर्यंत ज्या अनुज्ञप्त्या होत्या. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये नुतनीकरण वैध करण्यात येणार आहे. दरम्यान, नुतनीकरण अर्जासोबत २०२१-२२ शासनाने ठरवून दिलेले शुल्क भरावे लागणार आहे. विशेष म्हणजे, ज्या जागेसाठी प्रथम अनुज्ञप्ती देण्यात आली होती. त्याच जागेवर नव्याने परवाना नुतनीकरण होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या जागेवर दुकान सुरु करण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची निराशा झाली आहे. काहींनी जुन्याच जागेची डागडुजी सुरु केली            आहे. 

गडचिरोलीतील व्यावसायिकांचेही लक्ष- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील काही व्यावसायिकांनी चंद्रपूर येथे व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात प्रयत्न सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. - गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे तेथील व्यावसायिकांनी चंद्रपूर जिल्ह्याकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. विशेष म्हणजे, तेथील बंदीनंतर चंद्रपूरसारखीच गडचिरोलीचीही अवस्था असल्याचे बोलल्या जात आहे.-  चंद्रपूर-गडचिरोली सीमाभागामध्ये अनेकांचे लक्ष असून या माध्यमातून पुढील आर्थिक चक्र फिरणार आहे. 

गाठीभेटींना आला वेग

दारूबंदी उठल्यानंतर काहींनी नवीन परवाना मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. तर काहींनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी या व्यवसायात उतरण्याचे स्वप्न बघणे सुरु केले आहे. त्यासाठी जुन्या परवाना धारकांच्या गाठीभेटी घेणे सुरु केले आहे. मात्र त्यांचे स्वप्न पूर्ण होते की स्वप्नच राहते, ही येणारी वेळच सांगणार आहे. सध्यातरी दुकाने सुरु होण्याची अनेकांना प्रतीक्षा लागली आहे. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदी